"कमला नेहरू रुग्णालयात अतिदक्षता विभाग हवा' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

पुणे : कमला नेहरू रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करावा, अशी मागणी नगरसेविका सुजाता शेट्टी यांनी आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. यासाठी वर्गीकरणाद्वारे निधी उपलब्ध करून देण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. 

मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू झाला, तर या भागातील गरीब रुग्णांना उपयुक्त ठरेल. या ठिकाणी किमान 20 रुग्णांवर उपचार करता येईल एवढ्या क्षमतेचा अतिदक्षता विभाग असावा, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे. यासाठी आर्थिक तरतूद वर्गीकरणातून उपलब्ध करून देण्यासाठी स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, अशी माहिती शेट्टी यांनी कळविली आहे.

शेट्टी यांच्या एक वर्षाच्या कामाच्या अहवालाचे प्रकाशन माजी नगरसेवक बुवा नलावडे यांच्या हस्ते नुकतेच झाले. या वेळी शेट्टी, सदानंद शेट्टी, वैशाली भातकर, वंदना कवटे आदी उपस्थित होते. त्या वेळी त्यांनी अतिदक्षता विभागाच्या मागणीविषयी उपस्थितांना माहिती दिली. 
 
Web Title: Kamla Nehru hospital wants ICU department