मावळातील २५ गावांचा संपर्क तुटला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

कामशेत - गेल्या पाच दिवसांपासून कामशेत, नाणे मावळ भागात मुसळधार पाऊस झाल्याने इंद्रायणी नदीपात्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. वडिवळे पूल गुरुवारी रात्री पाण्याखाली गेल्याने २५ गावांतील नागरिकांचा शहरी भागाकडे येण्यासाठी संपर्क तुटला आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत पाणी कमी झाले नव्हते.

गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास पूल पाण्याखाली गेल्याने वळक, वडिवळे, नेसावे, बुधवडी, वेलोळी, सांगिसे, खांडशी, उंबरवाडी यांच्यासह अन्य गावांना फटका बसला आहे. या भागातून शाळेसाठी विद्यार्थी कामशेत येथे येतात. परंतु, गुरुवारी सकाळी पूल पाण्याखाली गेल्याने शालेय विद्यार्थी, दूध व्यावसायिक,कामगार यांना पुलावर पाणी असल्याने पुन्हा घरी जावे लागले. तर काहींनी जीव धोक्‍यात घालून पूल पार केला.

गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. कामशेत, करंजगाव, गोवित्री, थोरण जांभवली, सोमवडी, खांडशी, नेसावे, सांगिसे व अन्य गावात जोरदार पाऊस सुरू आहे. काही भागांत भातखाचरे नदी, नाले, ओढे पाण्याने भरून गेली आहेत. इंद्रायणी नदीच्या पात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. वडिवळे पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी हा पूल पाण्याखाली जातो त्याचा फटका नागरिकांना बसतो. सदरचा पूल करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी पाच वर्षांपासून केली आहे. मात्र, अद्याप शासनाला जाग आली नाही. वडिवळे धरण परिसरात एकूण पाऊस ६५० मिलिमीटर पडला असून २१ टक्के धरण भरले आहे.

Web Title: kamshet news rain