कान्हूर मेसाई ते सविंदणे काम निकृष्ट दर्जाचे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई ते सविंदणे या रस्त्य़ाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. नव्यानेत तयार करण्यात आलेल्या या कामाची अवघ्या तीन महिन्यात दुरावस्था झाली आहे. या कामाची चौकशी करून संबधीत अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. 

टाकळी हाजी - शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई ते सविंदणे या रस्त्य़ाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. नव्यानेत तयार करण्यात आलेल्या या कामाची अवघ्या तीन महिन्यात दुरावस्था झाली आहे. या कामाची चौकशी करून संबधीत अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कान्हूर मेसाई ते सविंदणे या रस्त्याचे काम करण्यात आले होते. यासाठी 502.11 लक्ष रूपयांचा निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला होता. ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून या कामाला अर्थ सहाय्य देण्यात आले होते. यासाठी कार्यकारी अभीयंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधान मंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था पुणे यांच्या माध्यमातून यंत्रणा उभी करण्यात आली होती. 7.800 कि. मी. लांबीचा डांबरी रस्ता तयार करण्यात येणार होता. याकामात 125 मी. मी. जाडीचा जी. एस. बी., खडीकरण, डांबरीकरण, पूल व मोऱ्यांची कामे होणार होती. एप्रिल 2018 मध्ये हे काम पुर्ण करण्यात आले. मात्र हे काम योग्य डांबरीकरण व खडीकरण न करताच करण्यात आले. त्यामुळे अवघ्या तीन महिण्यात या रस्त्याची दुरावस्था झालेली पहावयास मिळते. संबधीत अधिकाऱ्यांनी या कामावर दुर्लक्ष केल्याने सरकारचा मोठा निधी वाया गेला. रात्रीच्या अवैद्य वाळूच्या अवजड गाड्या जातात. असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. हे काम करत असताना अनेक शेतकऱ्यांचे पाईप लाईन फुटली. या कामामुळे गावची पाणी पुरवठा योजना देखील बंद पडली आहे. संबधीत ठेकेदारावर शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. त्यावर पोलीस स्टेशन देखील कोणतीच दखल घेतली नसल्याचे येथील सरपंच दादा खर्डे यांनी सांगितले. 

याबाबत संबधीत अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. 

Web Title: From Kanhur Masai to Sawandane, work is of low quality