राजगड पोलिस निरीक्षकांच्या धडक कारवाईने कापुरव्होळ चौक झाला टपरीमुक्त

पुन्हा टपरी टाकल्यास दाखल होणार गुन्हा.
Pune
PuneSakal

नसरापूर : अवैध वाहतुकीच्या वाहनांनी गजबलेल्या कापुरव्होळ चौकात आज राजगड पोलिस (Police) ठाण्याचे पोलिस (Police) निरीक्षक सचिन पाटील (Sachin Patil) यांनी धडक कारवाई करत अवघ्या 15 मिनिटात चौकासह सेवा रस्ता व महामार्गाला लागुन असलेल्या सर्व टपरया व वाहनांना हलवल्याने कापुरव्होळ चौकाने मोकळा श्वास घेतला, पुन्हा येथे टपरी मांडल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा यावेळी निरीक्षक पाटील (Patil) यांनी दिला आहे.

पुणे सातारा महामार्गावर कापुरव्होळ ता.भोर चौकात खाद्यपदार्थ,चहा,फळे व इतर वस्तुंच्या टपरी व तसेच अवैध वाहतुक करणारी वाहने यामुळे कायमच गर्दी होत असते त्यामुळे प्रवाशांना, नागरीकांना रस्त्यावर धोकादायकपणे उभे राहुन एसटी,पीएमपीएल बसची वाट पहावी लागत होती या बाबत अनेक वेळा कारवाई देखिल झाली होती परंतु सरसकट कारवाई होत नसल्याने काही दिवसात पुन्हा टपरया मांडल्या जात होत्या.

राजगड पोलिस ठाण्यात नव्याने दाखल झालेले पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांनी या बाबत ठोस भुमिका घेत, सकाळी पोलिस पथकासह चौकात जाऊन अवघ्या पंधरा मिनिटात या भागातील सर्व टपरया हटवल्या व पुन्हा मांडल्या जाऊ नयेत यासाठी कापुरव्होळचे ग्रामस्थांची चौकातच बैठक घेऊन पुन्हा टपरया येथे येणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सुचना केल्या.यावेळी कापुरव्होळचे उपसरपंच पंकज गाडे,पोलिस पाटील सय्यद शेख,सदस्य बंडु गाडे व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Pune
मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंनी तोंड सांभाळून बोलावं

ग्रामस्थांशी बोलताना यावेळी पाटील यांनी सांगितले कि, या चौकात एसटी पीएमपी बस महामार्गावर थांबत असल्याने धोकादायक आहे हे थांबे सेवा रस्त्यावर झाल्यास मुख्यरस्ता मोकळा होणार आहे त्यासाठी एस टी थांब्या बाबत एस टी चे अधिकारी व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक घेणार असुन महामार्गावरकिकवी, कापुरव्होळ,हरिश्चंद्री,वरवे येथे रस्त्याच्या दोन्ही बाजुस लोखंडी ग्रील बसण्यात यावे यासाठी महामार्ग प्रकल्प संचालकांशी पत्रव्यवहार केला आहे अशी माहीती त्यांनी दिली.हरिश्चंद्री गावासाठी महामार्गाच्या पुला खालील रस्त्याची पाहणी देखिल त्यांनी यावेळी केली व हा रस्ता लोकसहभागातुन करण्या बाबत तेथील नागरीकां बरोबर त्यांनी चर्चा केली.

महामार्गाप्रमाणे याचौकातील सासवड कडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील अतिक्रमण असुन या ठिकाणी देखील कारवाई करण्याची गरज असल्याचे मत अनेक प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com