कारणराजकारण : रोजगार वाढला सुविधा घटल्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

गेल्या काही वर्षात वडगाव शेरी परिसर मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. याठिकाणी अनेक नवीन उद्योग धंदे सुरू झाले. त्यातून नागरिकांना चांगला रोजगारही मिळाला. मात्र नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधांची वानवा कायम आहे, असे मत वडगाव शेरी मधील नागरिकांनी कारणराजकारणाच्या लाईव्ह मालिकेत मांडले. 

वडगावशेरी (पुणे) : गेल्या काही वर्षात वडगाव शेरी परिसर मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. याठिकाणी अनेक नवीन उद्योग धंदे सुरू झाले. त्यातून नागरिकांना चांगला रोजगारही मिळाला. मात्र नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधांची वानवा कायम आहे, असे मत वडगाव शेरी मधील नागरिकांनी कारणराजकारणाच्या लाईव्ह मालिकेत मांडले. 

मतदान मिळवण्यासाठी आकर्षक आश्वासने दिली जाताय, पण त्यांची पूर्तता करतील की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे जी आश्वासने दिली आहेत त्याचं न्यायालयात जाऊन अफेडेविड करावं, अशी मागणी एका तरुणाने केली. वडगाव शेरी मध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अनेक सोसायट्यांमध्ये केवळ चार तास पाणी येतं. त्याचा दबाव अत्यंत कमी असतो . त्यामुळे याठिकाणी पुरेशा प्रमाणात पाणी पुरवावे. 

निवडणूक अवघ्या चार दिवसांवर आली तरी अद्याप आम्हाला मतदानाच्या स्लिपा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे मतदानाचे केंद्र कुठे आहे हेच कळत नाही. नगरपालिकेला एका ठिकाणी विधानसभेला दुसऱ्या ठिकाणी आणि लोकसभेला तिसऱ्याच ठिकाणी केंद्र. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांचा गोंधळ झालेला आहे की, आपले मतदान केंद्र कुठे आहे. नागरिकांची ही अडचण दूर होणे गरजेचे आहे.

Web Title: KaranRajkaran Discussion with people at wadgaonsheri