कारणराजकारण : 'या' दोन मुद्द्यांभोवतीच मावळमधील राजकारण (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

'सकाळ'च्या #कारणराजकारण या उपक्रमामध्ये मावळ भागातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जलवाहिनीला प्रखर विरोध नागरिकांनी केला. येथील धरणग्रस्त नागरिकांचा प्रश्न अनेक वर्षापासून सुटलेला नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.

पुणे : पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला विरोध हे दोन महत्वाचे मुद्दे लोकसभा निवडणूकीत मावळ भागात आहेत. या मुद्या भोवतीच येथील राजकारण फिरत असल्याचे चित्र आहे.

'सकाळ'च्या #कारणराजकारण या उपक्रमामध्ये मावळ भागातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जलवाहिनीला प्रखर विरोध नागरिकांनी केला. येथील धरणग्रस्त नागरिकांचा प्रश्न अनेक वर्षापासून सुटलेला नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हा भाग कायम केंद्रस्थानी राहिला आहे. खासदार श्रीरंग बारणे आणि स्थानिक विद्यमान आमदार बाळा भेगडे यांची विकास कामे यावर युतीच्या प्रचाराचा जोर आहे. तर, धरणग्रस्थांचे पुनर्वसन, उड्डाणपूल, रेल्वेमार्गाचा विकास या प्रलंबित गोष्टी राष्ट्रवादी पक्षाकडून प्रचारात पुढे आणल्या जात आहेत.

आघाडी सरकारच्या काळात जलवाहिनीला विरोध करणाऱ्या नागरिकांवर करण्यात आलेल्या गोळीबारत तीन ग्रामस्थांना आपले प्राण गमवावे लागल्याने या भागात आघाडीविषयी नाराजी दिसून येते. त्याचबरोबर पवना धरणामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न युती सरकारमध्येही मार्गी लागला नसल्याने विद्यमान सरकारविषयी देखील नाराजी आहे. 

Web Title: KaranRajkaran politics in Maval Loksabha constituency