कोरेगाव-भीमा परिसर पोलिसांच्या निगराणीत : नांगरे पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

पुणे :  ''सकाळपासून विजयास्तंभास अभिवादन करण्यासाठी जे अनुयायी येत आहेत, त्यांना सुरळीतपणे हातळण्यात येत आहे. गर्दीचे नियमनास प्राधन्य दिले जात असून गर्दीचे विभाजन करुन विभागानुसार तसा बंदोबस्त केला आहे. गर्दीचा उत्साह अतिशय चांगला असून सुरळीतपणे व्यवस्थापण केले जात आहे. स्वयंसेवक समता सैनिक दल येणाऱ्या भाविकांचे सहकार्य करत आहेत. येणाऱ्या गर्दीकरीता जागा निर्माण करणे गरजेचे असून त्यावेळी वाहतूक स्तंभाचा 10 एकरचा परिसर मोकळा असणे गरजेचे आहे.'' अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

पुणे :  ''सकाळपासून विजयास्तंभास अभिवादन करण्यासाठी जे अनुयायी येत आहेत, त्यांना सुरळीतपणे हातळण्यात येत आहे. गर्दीचे नियमनास प्राधन्य दिले जात असून गर्दीचे विभाजन करुन विभागानुसार तसा बंदोबस्त केला आहे. गर्दीचा उत्साह अतिशय चांगला असून सुरळीतपणे व्यवस्थापण केले जात आहे. स्वयंसेवक समता सैनिक दल येणाऱ्या भाविकांचे सहकार्य करत आहेत. येणाऱ्या गर्दीकरीता जागा निर्माण करणे गरजेचे असून त्यावेळी वाहतूक स्तंभाचा 10 एकरचा परिसर मोकळा असणे गरजेचे आहे.'' अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि पोलिस अधीक्षक संदीप पाटील आणि त्यांची टीम हे आज (मंगळवार) पहाटेपासूनच कोरेगाव-भीमाजवळ पेरणे फाटा येथील विजयस्तंभाच्या बंदोबस्ताच्या ड्युटीवर हजर झाले. यावेळी ते कोरेगाव-भीमा येथील विजयास्तंभच्या बंदोबस्त संदर्भात माहीती

''वाहतूकीचे विभाजन केले आहे असून पार्किंगसाठी वेगळे जागा ठरवलेल्या आहेत. त्यामुळे वाहतूक पार्किंग देखील सुरळीत होत आहे. तसेच्या नगरच्या बाजूस जवळपास 100 बसेस आणि पुण्याच्या बाजूस 70 बसेस, वढुला साधारण 25 बसेसची सोय केली आहे. संपुर्ण परिसरावर पोलिसांच्या निगराणीत आहे. परिसरात जवळपास 100 व्हिडीओ कॅमेरे आणि सीसीटिव्ही कॅमेरे बसवले आहेत. तर 12 ड्रोम कॅमेरे आहेत. त्यामुळे परिसरातील सर्व परिस्थितीवर पोलिसांचे नियंत्रण आहे. वायरलेस सिस्टिममुळे पोलिसांना अंतर्गत संवाद साधता होत आहे. परिसरातील गावांमध्ये कायदेशीर कारवाई लागू केल्यामुळे गावगावातील वातवरण शांत आहे. 

 नांगरे यांनी गेल्या वर्षी स्थानिक नागरिक आणि अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याचा प्रयत्न केला होता. चिडलेला जमाव त्यांच्या शब्दांवर शांत झाल्याचा अनुभव सणसवाडी येथे आला होता. या भागाची त्यांना पुणे एसपी असल्यापासून माहिती असल्याने त्याचा उपयोग झाला होता.

 गेल्या वर्षीचा प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी पुरेशी दक्षता घेतली आहे. तब्ब्ल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त पेरणे फाटा परिसरात लावण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलिस येथे तळ ठोकून आहेत. राज्याच्या मुख्य नियंत्रण कक्षाला सतत अपडेट दिले जात आहेत. तसेच पुण्यातही पोलिस टिम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. खासगी वाहनांना विजयस्तंभाजवळ येण्यास मनाई करण्यात आली आहे. ड्रोन कॅमेऱ्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी निर्धास्तपणे यावे, असे आवाहन नांगरे पाटील यांनी केले. स्थानिक नागरिकांनीही येणाऱ्या गर्दीचे उत्साहात स्वागत केले.

 

Web Title: Karegaon-Bhima campus under the Surveillance of Police : Nangare Patil