‘कारगिल मॅरेथॉन’मध्ये सहभागी होणेच कौतुकास्पद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

पुणे - ‘‘कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन हा चांगला उपक्रम असून, ही स्पर्धा जिंकण्यापेक्षा त्यात सहभागी होणे हेच मोठे कौतुकास्पद आहे,’’ असे जनरल वेद प्रकाश मलिक (निवृत्त) यांनी मंगळवारी (ता. २५) येथे सांगितले.
पुण्याच्या ‘सरहद’ संस्थेने ‘स्वानंद ॲडव्हेंचर्स’, ‘रन बडिज क्‍लब’ आणि ‘सेवक एनजीओ कारगिल’ यांच्यातर्फे ‘कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन २०१७’चे आयोजन केले आहे. १६ जुलै रोजी होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचे प्रकाशन मलिक यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

‘सरहद’चे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, संजीव शहा, सतीश बनवट आणि अरविंद बिचवे या वेळी उपस्थित होते. 

कारगिल ते द्रास यादरम्यान १२० किलो मीटरची ही मॅरेथॉन होणार आहे. 
मलिक म्हणाले, ‘‘कारगिल, द्रास हा भाग खूप सुंदर आहे. जगात अशा प्रकारचे निसर्गसौंदर्य फारच कमी ठिकाणी बघायला मिळेल. हा भाग जितका सुंदर आहे, तितकाच तो कठीण आहे. येथील पर्यावरण, उंच हिमशिखरे हे यांचे वैशिष्ट्य आहे. अशा भागात ही स्पर्धा घेणे ही कल्पनाच स्वागतार्ह आहे.’’
यात लष्करातील जवानांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक नहार यांनी केले. 

Web Title: kargil international marathon