का-हाटी ते मोरगाव थर्मोप्लास्ट पट्टे आखल्याने वाहनचालकांना दिलासा...

हायब्रीड अँन्युईटी अंतर्गत मोरगाव ते बारामती या रस्त्याच्या डांबरीकरणाचे मोरगाव ते का-हाटीपर्यंतचे काम नुकतेच पूर्ण झाले
KarHati to Morgaon road White stripes thermoplast 50 km road work complete baramati
KarHati to Morgaon road White stripes thermoplast 50 km road work complete baramatisakal

बारामती - हायब्रीड अँन्युईटी अंतर्गत मोरगाव ते बारामती या रस्त्याच्या डांबरीकरणाचे मोरगाव ते का-हाटीपर्यंतचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर का-हाटीपर्यंत थर्मोप्लास्टचे पांढरे पट्टे आखण्यात आले असून लवकरच रेडीयमचे कॅट आईज देखील बसविले जाणार आहेत. जेजुरी ते नीरानरसिंगपूर दरम्यान हा रस्ता होणार असून यातील जेजुरी ते बारामतीपर्यंतच्या 50 कि.मी. मार्गाचे काम पूर्णत्वास गेले आहे. जेजुरी मोरगाव रस्त्याचे काम पूर्ण होऊन अनेक महिन्यांचा कालावधी उलटला होता.

मोरगाव ते बारामती या टप्प्यावर रात्रीच्या वेळेस अंधाराचा अंदाज न आल्याने अनेक अपघात घडले होते. या रस्त्यावर पांढ-या रंगाचे थर्मोप्लास्टचे पट्टे मारावेत अशी मागणी वाहनचालकांची होती. अखेर या टप्प्यापैकी निम्मा टप्पा पूर्ण झाला असून येत्या चार दिवसात का-हाटी ते बारामती पर्यंतचे डांबरीकरण व त्या पाठोपाठ थर्मोप्लास्टच्या पट्ट्यांचेही काम केले जाणार आहे. या शिवाय जेथे मुख्य रस्त्याला छोटे रस्ते येऊन मिळतात तेथे थर्मोप्लास्टचे रम्बलर्स तयार केले जाणार आहेत. का-हाटीपर्यंत आता रात्रीच्या वेळेसही वाहनचालक सहजतेने वाहन चालवू शकत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com