करिअम्माला मिळाला कृत्रिम रोबोटचा हात

Kariamma got artificial robot hands
Kariamma got artificial robot hands

जुनी सांगवी, (पुणे) : येथील  करिअम्मा व सिमा उत्तेकर यांना नुकताच कृत्रिम रोबोट हात बसविण्यात आला आहे. कृत्रिम, रोबोट हातामुळे करिअम्मा यांना आता छोटी-मोठी कामे करता येणार आहेत. कष्टकरी मजुर कुटुंबात जन्म घेतलेल्या करीअम्माला शाळेत जावुन शिक्षण घेण्याऐवेजी वयाच्या १५ व्या वर्षापासुन मोलमजुरी करावी लागली. मुळ कर्नाटक राज्यातुन उदरनिर्वाहासाठी पिंपरी चिंचवड शहरात अशी अनेक कुटुंब वास्तव्यास आलेली आहेत. येथील मुळानदी किनारा परिसरात तीस चाळीस वर्षापासुन झोपडीत राहणारी मजुरांची वस्ती या वस्तीत करीअम्मा परिस्थितीमुळे शिक्षणापासुन दुरावली. वयाच्या पंधराव्या वर्षापासुनच तिच्या नशीबी मजुरीकाम आले. ही सर्व मंडळी बांधकाम मजुर म्हणुन काम करतात. यातील बहुतांश मंडळी खोदकामापासुन ते स्लँब भरण्यापर्यंतची कामे करतात. यातील बरीचशी मजुर मंडळी आता ठेकेदारी करून पुढारली आहेत. 

वयाच्या पंधराव्या वर्षी मोशी येथे अशाच एका स्लॅबच्या कामाच्या वेळी करीअम्माला विजेचा शॉक लागला. या अपघातात करीअम्माला  एक हात गमवावा लागला. अपघातातुन सावरत ती जिद्दीने उभी राहिली. ३७ वर्ष वय असलेल्या करीअम्मास दोन मुली व दोन मुले आहेत. तर पती मोलमजुरी करतात. करीअम्मा जुनी सांगवी परिसरातील उद्यानासमोर हातगाडीवर चणे, फुटाणे, रानमेवा, कुरकुरे आदी विकुन कुटुंबाला हातभार लावते. 

आजवर करिअम्माला दिव्यांगांच्या कोणत्याही सवलती मिळालेल्या नाहीत. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आदिती निकम यांनी ही गोष्ट स्थानिक नगसेवकांच्या लक्षात आणुन दिली. स्थानिक नगरसेवक हर्षल ढोरे, माई ढोरे यांनी करिअम्माला संजय गांधी निराधार योजनेतुन व पंडित दीनदयाळ उपाध्याय दिव्यांग कल्याणकारी (अर्थसहाय्य) योजनेतून या समितीच्या सदस्य आदिती निकम यांच्यामार्फत पाठपुरावा करून कृत्रिम रोबोट हात नुकताच बसविण्यात आला आहे. यामुळे करीअम्मा या रोबोट हाताने दैनंदिन किरकोळ कामे करू शकणार आहेत. याच बरोबर जन्मतच पोलिओ आजाराने हात निकामी झालेल्या जुनी सांगवी येथील सिमा उत्तेकर यांनाही असाच रोबो हात बसविण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com