कर्जत जामखेड वेगळे मॉडेल ः रोहित पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

""बारामती मॉडेल कर्जतला करणार नाही. तर कर्जत जामखेडचे वेगळे मॉडेल तयार करणार आहे,'' असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी (ता. 7) देहू येथे प्रा. रामकृष्ण मोरे स्मृती व्याख्यानमालेत केले.

देहू (पुणे)ः ""बारामती मॉडेल कर्जतला करणार नाही. तर कर्जत जामखेडचे वेगळे मॉडेल तयार करणार आहे,'' असे प्रतिपादन नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी (ता. 7) देहू येथे प्रा. रामकृष्ण मोरे स्मृती व्याख्यानमालेत केले. पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. "बरेच नेते पुणे, मुंबई येथे राहतात. आपण कोठून कंट्रोल करणार,' या निरगुडकर यांच्या प्रश्‍नावर पवार म्हणाले, ""कर्जत जामखेड मतदारसंघात अनेक समस्या आहेत. काही भागात धान्य पोचत नाही. पाणी समस्या आहे. 70 टक्के समस्या कायम आहेत. त्यामुळे दोन दिवस पुणे, बारामती, दोन दिवस मुंबई व उर्वरित कर्जत असा मुक्काम राहणार आहे. एकंदर घराणेशाहीचा ठपका नको. स्वतंत्रपणे काहीतरी करण्याची धमक घेऊन राजकारणात उतरलो आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karjat will be different from Baramati, assures Rohit Pawar