रोड रोमिओंवर कारवाईसाठी कारखेल गाव व विद्यालय बंद

विजय मोरे
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

उंडवडी : कारखेल येथे गेल्या काही दिवसांपासून रोडरोमिओंकडून विद्यालयातील मुलींच्या छेडाछेडीचे प्रकार वाढले आहेत. या रोडरोमिओंवर पोलिसांनी तातडीने कडक कारवाई व्हावी. या मागणीसाठी आज येथील ग्रामस्थांनी एकत्रित येवून गाव बंद ठेवून न्यू इंग्लिश स्कूल व प्राथमिक शाळेला सुट्टी देण्यास भाग पाडले. 

उंडवडी : कारखेल येथे गेल्या काही दिवसांपासून रोडरोमिओंकडून विद्यालयातील मुलींच्या छेडाछेडीचे प्रकार वाढले आहेत. या रोडरोमिओंवर पोलिसांनी तातडीने कडक कारवाई व्हावी. या मागणीसाठी आज येथील ग्रामस्थांनी एकत्रित येवून गाव बंद ठेवून न्यू इंग्लिश स्कूल व प्राथमिक शाळेला सुट्टी देण्यास भाग पाडले. 

येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचवी ते दहावी पर्यंतच्या शिक्षणासाठी परिसरातील गावातून मुले आणि मुली येत असतात. या मुलीना गावातील रोडरोमिओ मुले त्रास देत असल्याचे अनेक घटना समोर येवू लागल्या आहेत. दोन दिवसापूर्वी येथील काही रोडरोमिओ तरुणांनी एका विद्यालयातील मुलीची छेड काढली होती. त्यानंतर पिढीत मुलीने आणि पालकांनी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तीन मुलांच्या विरुध्दात विनय भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपीना अटक केले नव्हते. त्यामुळे चिडलेल्या गावकऱ्यांनी आज मोठ्या संख्येने एकत्रित येवून गावातून मुक मोर्चा काढून गावातील दुकाने बंद केली.  तसेच प्राथमिक शाळा व विद्यालय बंद ठेवण्यास भाग पाडले. 

याबाबत येथील सरपंच शरद वाबळे व ग्रामस्थांनी लेखी तक्रारी निवेदनावर तयार करुन त्याच्यावर स्वाक्षऱ्या करुन वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन व शाळेला निवेदन दिले. दरम्यान, आज सकाळी न्यू इंग्लिश स्कूल हे विद्यालय सुरु झाल्यानंतर गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येवून शाळेत मुक मोर्चा नेहून पोलिस येईपर्यंत शाळेच्या समोरील मैदानात ठिय्या मांडला. यावेळी येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. येथील पोलिस पाटील सचिन जगताप यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना घटनास्थळावर पाचारण केले. 

काही वेळातचं वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राजाराम साळुंके हे घटनास्थळावर दाखल झाले. यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करताना साळुंके यांनी विनयभंग केलेल्या आरोपीना तातडीने अटक करु व मुलींना त्रास देणाऱ्या रोडरोमिओवर कडक कारवाई करु, असे असे आश्वासन दिले. त्यामुळे येथे इतर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

 

Web Title: karkhel village and school closed for action against road romio