कर्मयोगी साखर कारखाना पंधरा लाख टन ऊसाचे गाळप करणार : हर्षवर्धन पाटील

Karmayogi sugar factory will make 15 million tons of sugarcane crushing says Harshvardhan Patil
Karmayogi sugar factory will make 15 million tons of sugarcane crushing says Harshvardhan Patil

भिगवण : कर्मयोगीचे विस्तारीकरण, दुष्काळीस्थिती, सरकारचे धोरण यामुळे मागील काही वर्षामध्ये कारखान्यांसमोर अडचणी होत्या. संचालक मंडळाने योग्य नियोजन करत मागील वर्षी १० लाख ११ हजार टनाचे गाळप केले असून २०१८-१९ च्या गळीत हंगामासाठी कारखान्याकडे ३३ हजार एकर ऊसाचे क्षेत्र उपलब्ध आहे. कार्यक्षेत्रातील ऊसाचे क्षेत्र विचारात घेऊ चालू हंगामासाठी कर्मयोगी कारखान्याच्या वतीने १५ लाख टन उसाच्या गाळपाचे नियोजन केले असल्याची माहिती कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

येथील तारादेवी लॉन्समध्ये कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याच्या वतीने आयोजित ऊस पिक परिसंवादामध्ये ते बोलत होते. कर्मयोगीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, संचालक रमेश जाधव, य़शंवत वाघ, माजी संचालक रंगनाथ देवकाते, केशव जगताप, अशोक रायसोनी, प्रमिला जाधव, पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, संपत बंडगर व संचालक उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक शंकरराव पाटील यांनी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना उभारल्यामुळे ऊस उत्पादन शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याबरोबरच रोजगाराची निर्मिती होऊन तालुक्यामध्ये आर्थिक क्रांती घडून आली आहे. कारखान्याला ऊस न घालणाऱ्या विरोधकांकडून कारखाना कर्जबाजारी झाल्याची टीका करण्यात येत आहे. त्याकडे फारसे लक्ष देण्याची आवश्यकता नाही.

सध्या कारखान्याच्या माध्यमातून कर्जाची नियमित फेड करण्यात येत असून संचालक मंडळाकडून करण्यात आलेल्या नियोजनानुसार मार्च २०२० मध्ये कर्मयोगी काऱखाना कर्जमुक्त होईल. राज्यातील काही शेतकरी ऊसाचे एकरी एकशे पन्नास टन उत्पन्न घेत आहे. कर्मयोगी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी असा प्रयत्न करावा असे पाटील म्हणाले.

पद्मताई भोसले म्हणाल्या, कर्मयोगीच्या माध्यमातून ऊस उत्पादन सभासदांच्या हितास सर्वोच्य प्राधान्य देण्यात येत आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसाचे एकरी उत्पादन हे चाळीस टनापर्यत आले आहे त्यामध्ये वाढ होण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन व्हावे या हेतूने कारखाना कार्यक्षेत्रात ऊस परिसंवादसारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे त्याचा ऊस उत्पादन शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. 

यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिटयुटचे कृषी शास्त्रज्ञ सुरेश माने यांनी एकरी शंभर टन ऊस उत्पादन या विषयावर तर पर्यावरणतज्ञ जे. व्ही. माने यांनी पर्यावरण समतोल या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.  प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी केले, सुत्रसंचालन शरद काळे तर आभार कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अशोक शिंदे यांनी मानले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com