झेडपी शाळांना शुक्रवारी नव्हे शनिवारी सुट्टी

Kartiki Ekadashi holiday to ZP schools on Saturday
Kartiki Ekadashi holiday to ZP schools on Saturday

पुणे : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना नियोजित वेळापत्रकानुसार कार्तिकी एकादशीची सुट्टी येत्या 22 नोव्हेंबर (शुक्रवारी) जाहीर करण्यात आलेली सुट्टी रद्द करण्यात आली आहे. ही सुट्टी शुक्रवारऐवजी येत्या शनिवारी (ता.23) देण्यात आली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

कार्तिकी एकादशी ही शनिवारी आल्याने, हा बदल करण्यात आला आहे. यामुळे सर्व शिक्षकांनी येत्या शुक्रवारी (ता.22) नियमितपणे शाळा सुरू ठेवाव्यात आणि शनिवारी (ता.23) सुट्टी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील कुऱ्हाडे यांनी केले आहे.

मंत्रालयाचे झाले सचिवालय; नावही हटविले

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हा परिषद शाळांसाठीच्या वर्षभरातील सुट्ट्यांची यादी वर्षाच्या सुरवातीलाच जाहीर करण्यात येते. ही यादी जिल्हा परिषदेच्या डायरीत आणि संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येते. यानुसार यंदाच्या कार्तिक एकादशीची सुट्टी ही नियोजित कार्यक्रमानुसार 22 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आली होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे. याबाबतचे सर्व पंचायत समित्यांच्या गट शिक्षण
अधिकाऱ्यांना बुधवारी (ता.20) पाठविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com