कर्वे रस्त्यावर अनेक ठिकाणी दुभाजकाची दैना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 मे 2017

कोथरूड - कर्वे रस्त्यावर खंडोजीबाबा चौक ते पौड फाटा दरम्यान दुभाजकाची उंची कमी असल्याने पादचारी सर्रास रस्ता ओलांडताना दिसून येत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दुभाजकाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे. 

कर्वे रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. याचबरोबर खंडोजीबाबा चौक ते पौड फाटा दरम्यान आठ ते दहा बस थांबे आहेत. या मार्गावर कमी उंचीचे दुभाजक असल्याने वाहने दुभाजकावर आदळून अपघात होत आहेत. 

दुभाजकांची उंची इंडियन रेड काँग्रेसच्या (आयआरसी) नियमाप्रमाणे केल्यास अपघात रोखण्यास मदत होईल. कर्वेनगर ते आंबेडकर चौक दरम्यान कित्येक दुभाजकांची स्थिती अतिशय धोकादायक आहे. कर्वेनगर येथे उड्डाण पुलाचे काम सुरू असून, त्याच्या खाली पत्र्याचे दुभाजक तयार केले आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना दिसण्यासाठी रिफ्लेक्‍टर, आवश्‍यक रंगाचे पट्टे नसल्याने सतत अपघात होत आहेत.

तसेच काही ठिकाणी स्थानिक नागरिकांनी दुभाजकाची तोडफोड करून ये-जा सुरू केली आहे. तसेच वारजे जलशुद्धीकरण केंद्रासमोरील दुभाजक प्लॅस्टिकचे असून, ते केवळ उभे केले आहेत. 

दुभाजकातील झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्याने अपघाताची शक्‍यता.

डहाणूकर कॉलनीजवळ दुभाजक दीड ते दोन फूट उंचीचा, तर काही ठिकाणी उंची एक फुटापेक्षा कमी.

दुभाजकाला रिफ्लेक्‍टर नाहीत. 

दुभाजकाची तोडफोड करून स्थानिकांची ये-जा सुरू.

Web Title: karve road many places divider bad condition