
Kasba Bypoll Election 2023: कसब्यात ब्राह्मण मतं ठरणार किंगमेकर? अशी आहेत जातीय समीकरणे
Pune By Election News: कसबा पोटनिवडणूकीकडे अंधेरी पोटनिवडणूकीनंतर संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले आहे. या पोटनिवडणूकीत दररोज नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतायत. आधी कसब्याची जागा कोण लढणार यावरुन गोंधळ सुरु होता.
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश यांना ‘कसब्या’तून उमेदवारी मिळणार, अशी चर्चा असतानाच शैलेश टिळक यांनाच भाजपा नेत्तृवाने उमेदवारी नाकारली.
त्याठिकाणी नवीन चेहरा म्हणजेच हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. रासनेंना उमेदवारी दिल्यामुळे शैलश टिळकांनी नाराजी व्यक्त केली..त्यानंतर कसब्यात काही पोस्टर लागली... पोस्टरच सूर असा होता की भाजपामध्ये ब्राम्हणांना डावलल्या जाते. खरंच असं झालयं का..
टिळकांना तिकीट न देण्यामागे भाजपचं जातीय आधारीत सोशल इंजिनिअरीगंचं काही प्रयोग आहे का... कसब्यात आणि पर्यायाने पुण्यात भाजपा ब्राम्हण मतदानावर भाजपाचा उमेदवार निवडूण येतात का? आणि आता भाजपाने कसब्यात ब्राह्मण उमेदवार न दिल्याचा भाजपाला फटका बसणार का? कसब्यात इतिहास काय सांगतो. जाणून घेवूयात पुढील काही मिनिटांत.
कसबा मतदार संघात शैलेश टिळकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजपाने ब्राम्हणांना डावललण्यात आले. अशा अर्थाचे पोस्टर वॉर पुण्यात सुरू झाले आहे.
शहरात तब्बल २४ ठिकाणी पोस्टर लावण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे सकाळपासून राज्याच्या राजकारणात कसबा पोटनिवडणूकीची जोरदार चर्चा रंगलीय.
४० वर्षे भाजपाला साथ देणाऱ्या कसबा मतदार संघाचा इतिहास काय आहे तर कसब्यामध्ये वर्षे २००९पासून गिरिश बापट भाजपा आमदार राहिले आहे. बापटांच्या आधी सुद्धा अरविंद लेले, अण्णा जोशी हे याच मतदार संघातून आमदार राहिलेत.
म्हणजेच लेले, जोशी, बापट, टिळक या ब्राम्हण लोकप्रतिनिधींनंतर पहिल्यांदाच रासने यांच्या रुपाने कसब्याला ओबीसी उमेदवार मिळालाय.. आणि कदाचित याच कारणामुळे ब्राम्हण समाजातील काही घटकांमध्ये आपल्याला भाजपामध्ये डावल्याला जात आहे, अशी भावना जोर धरत आहे.
याआधीही ऑक्टोबर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना डावलतं चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. प्रा. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले होते.
चंद्रकांत पाटील यांना निवडून आणण्यासाठी कोथरूड ‘सुरक्षित’ मतदारसंघ असल्यानेच प्रा. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारली होती. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन पक्षाने केले.
पण खरंच ब्राह्मण समाज जर भाजपावर नाराज झाला तर भाजपाला कसब्यात फटका बसेल का?
एकदा आकडेवारी पाहुयात..
कसबा पेठ मतदारसंघातील जातीनिहाय लोकसंख्या ( २०१९ )
एससी - 9.67 टक्के
एसटी - ४.१७
मुस्लिम - १०.०५
मराठा - २३.८५
ओबीसी - ३१.४५
ब्राह्मण - १३.०५
इतर - ७.११
अशी आकडेवारी आपल्याला दिसून येते. त्यामुळे या आकडेवारीचं गणित पाहता ब्राम्हण समाजाचं १३.०५ टक्के प्रमाण आहे तर सर्वाधिक ३१.४५ टक्के ओबीसी आहेत...त्यामुळे ब्राम्हण समाजाची आकडेवारी लक्षणीय असली तरी निर्णायक नाही. दुसरीकडे कॉंग्रेसने सुद्धा आज आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले.
टिळक घराण्याचे वारसदार रोहित टिळक यांना डावलून कॉंग्रेसने रवींद्र धंगेकर यांना तिकीट दिले आहे. एकेकाळचे मनसेचे धडाकेबाज नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे धंगेकर हे देखील ओबीसी समाजाचे आहेत.
तर दुसरीकडे हिंदू महासंघाचे आनंद दवे हे ब्राम्हण समाजावर अन्यायाची ललकार देत निवडणुकीला उतरत आहेत. एकूणच कसबा निवडणुक इंटरेस्टिंग झाली आणि त्यात जात फॅक्टर महत्वाचा ठरणार हे नक्की.