
Kasaba ByPoll : 'त्याला इथंच मारला असता'; अर्ज भरताना लहुजी छावा संघटना - अभिजित बिचुकले यांच्यात बाचाबाची
आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकिसाठी विविध पक्षातील अनेक इच्छूक उमेदवारांनी उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी अभिजीत बिचुकले त्याची पत्नी अलंकृता यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले असताना तिथे त्याची बाचाबाची झाली आहे.
आपल्या उमेदवाराच अर्ज भरण्यासाठी लहुजी छावा संघटनेकडून काही जण उपस्थित होते. यावेळी अभिजित बिचुकलेसोबत फोटो काढण्यासाठी या संघटनेचे लोक गेले. त्यावेळी हा गोंधळ झाल्याचं सांगण्यात येत आहे. लहुजी छावा संघटनेचे संस्थापक सचिन इंगळे यांनी सांगितलं की, आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत फोटो काढायला गेलो, त्यावेळी त्यांनी आमच्या गळ्यातला पिवळा झेंडा काढायला सांगितला. मी म्हणालो की मी नाही काढू शकत, मला फोटो काढायची इच्छा आता नाही. मला माझा समाज प्यारा आहे तू निघ.
दोघांमध्ये खूप बाचाबाची झाली, मी त्यांना शिवीगाळ केली, असंही सचिन इंगळे म्हणाले. त्यावर अभिजीत बिचुकले काय बोलले हे विचारलं असता "तो काय बोलेल, त्याला तिथेच मारला असता", असं उत्तर सचिन इंगळे यांनी दिलं.
याविषयी माध्यम प्रतिनिधींनी अभिजीत बिचुकलेशीही संवाद साधला. बिचुकले म्हणाला, "मला ते म्हणाले की तुम्ही जयभीम वाले, आम्ही लहुजी वाले आहे. हा मुद्दा इलेक्शनचा नाही. तुम्ही जातीय वाद काढू नका. मी आंबेडकरांचा वारस आहे. मी जयभीम म्हणाल्यावर त्यांना राग का आला? कोण होता तो बांडगुळ काय माहित?"