Kasaba bypoll Election : बापटांच्या कट्टर विरोधकांला काँग्रेसची उमेदवारी; जाणून घ्या कोण आहेत रवींद्र धंगेकर Kasaba bypoll Election congress fixed candidate ravindra dhangekar profile | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasaba bypoll Election

Kasaba bypoll Election : बापटांच्या कट्टर विरोधकांला काँग्रेसची उमेदवारी; जाणून घ्या कोण आहेत रवींद्र धंगेकर

कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 'कसब्यातून रासने आणि धंगेकर याच्यात लढत होईल,होणार आहे.

कोण आहेत काँग्रेसचे कसब्याचे उमेदवार?

२००९ मध्ये भाजपच्या गिरीश बापट यांना ५४ हजार ९८२ तर धंगेकर हे तेव्हा मनसेत असूनही त्यांना ४६ हजार ८२० इतकी मतं मिळाली होती. २०१४ मध्ये काँग्रेसने गिरीश बापट यांच्या विरोधात रोहित टिळक यांना उभे केले होती मात्र याच निवडणुकीत रवींद्र धंगेकर हे मनसे मध्येच होते आणि त्यावेळी त्यांना २५ हजार ९९८ मतं मिळाली होती. शिवसेनेमध्ये दहा वर्षे आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून दहा वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून महापालिकेत काम पाहिले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले रविंद्र धंगेकर यांनी जानेवारी २०१७ मध्ये मुंबईत कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या काळात कसब्यामध्ये अनेक विकासकामे केली आहेत.

पोटनिवडणुकीसाठी आपली तयारी झाली असून विरोधकांकडून कोणताही उमेदवार असला तरी निवडणूक जिंकू असा विश्वास, असं धंगेकर यांनी काहीच दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. भाजप खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची पुणे शहरात ओळख आहे

आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ मतदार संघात पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते. पण त्याला विरोधी पक्षांना प्रतिसाद दिला नाही. फडणवीस यांनी टिळक कुटुंबियांची भेट घेतली होती. शनिवारी भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

टॅग्स :Pune Newselection