कासारसाई धरणाच्या भिंतीवरील प्रवेशद्वार गायब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

सोमाटणे - सुरक्षिततेच्या कारणास्तव कासारसाई धरणाच्या भिंतीवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यासाठी भिंतीकडे जाण्याचे प्रवेशद्वार बंद केल्याने अज्ञात व्यक्तींनी ते गायब केले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमाटणे - सुरक्षिततेच्या कारणास्तव कासारसाई धरणाच्या भिंतीवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घातली आहे. त्यासाठी भिंतीकडे जाण्याचे प्रवेशद्वार बंद केल्याने अज्ञात व्यक्तींनी ते गायब केले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कासारसाई धरणाच्या बांधणीनंतर पाटबंधारे विभागाच्या वतीने धरणावर लक्ष ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी धरणाच्या भिंतीवरून रस्ता करण्यात आला होता. मात्र, या रस्त्याचा वापर परिसरातील नागरिकांनी आपल्या खासगी वाहनांसाठीच अधिक प्रमाणात सुरू केला. गेली १५ वर्षे धरणाच्या भिंतीवरील या रस्त्यावरून खासगी वाहने ये-जा करीत होते. त्यानंतर मात्र पाटबंधारे विभागाने धरणाची सुरक्षितता विचारात घेऊन या वाहनांना बंदी घातली. हौशी पर्यटक धरणाच्या भिंतीवरून दुचाकीचा वापर करू लागले. तरुण पर्यटक सेल्फी काढण्यासाठी धरणाच्या भिंतीवर, पाणी सोडण्याच्या वीजपंप गेटवर चढून जात होते. . त्यामुळेच कासारसाई पाटबंधारे विभागाचे उपअभियंता व्ही. बी. फुंदे यांनी वरिष्ठांच्या परवानगीने धरणाच्या भिंतीवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूचे प्रवेशद्वार काही दिवसांपूर्वी बंद केले. गेट बंद झाल्याने धरणावर जाणे बंद झाले. त्यामुळे अज्ञात व्यक्तींनी दोन्ही बाजूचे गेट तोडले. याबाबत पाटबंधारे विभागाने तळेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Kasarsai Dam Wall Entry Gate Missing crime