कासारसाईच्या भिंतीवर सेल्फीसाठी अट्टहास

कासारासाई, सोमाटणे - धरणाच्या भिंतीवर सेल्फी काढणारे तरुण.
कासारासाई, सोमाटणे - धरणाच्या भिंतीवर सेल्फी काढणारे तरुण.

सोमाटणे - पावसाला सुरवात झाल्यानंतर हौशी पर्यटकांचा ओढा कासारसाई धरणाकडे वाढला आहे. दर गुरुवारी व रविवार वीकएंडला येथे पर्यटकांची गर्दी होते. मात्र, धरणाच्या धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी तरुण जात आहेत. ही सेल्फी त्यांना धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. 

सेल्फीच्या मोहापायी धरणाच्या गेटवर चढणे, दरवाजाच्या भिंतीवर उभे राहणे, धरणाच्या खालील बाजूच्या कॅनॉलच्या भिंतीवर चढणे आदी धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी तरुण गर्दी करत आहेत. या धरणावर संरक्षक कर्मचारी किंवा पोलिस संरक्षण नसल्याने अनेक तरुण पाण्यात उतरत आहेत. यातून मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍याता आहे. या तरुणांना आवर घालण्यासाठी येथे शनिवार, रविवार व गुरुवारी संरक्षक कर्मचारी नेमण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com