कासारवाडीत केली आई, मुलाची सुटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

खेळताना मुलाने बाथरूमच्या दरवाजाला बाहेरून कडी लावल्याने त्याची आई आतमध्ये अडकली. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची सुखरूप सुटका केली. पल्लवी मंगेश पानसरे (वय २७, रा. सागर प्लाझा, कासारवाडी) महिलेचे नाव आहे.

पिंपरी - खेळताना मुलाने बाथरूमच्या दरवाजाला बाहेरून कडी लावल्याने त्याची आई आतमध्ये अडकली. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची सुखरूप सुटका केली. पल्लवी मंगेश पानसरे (वय २७, रा. सागर प्लाझा, कासारवाडी) महिलेचे नाव आहे. 

सागर प्लाझा इमारतीत दोघे अडकल्याची माहिती अग्निशामक दलाला एका नागरिकाने कळविली. त्यानुसार चौथ्या मजल्यावर एक महिला आणि मुलगा अडकल्याचे समजले. कर्मचारी दरवाजा तोडून आत गेले असता मुलगा आदी मंगेश पानसरे (वय एक वर्ष) याने खेळताना बाथरूमच्या दरवाजाला बाहेरून कडी लावल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी या महिलेची सुटका केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kasarwadi rescues mother and child

टॅग्स