Kasba By Election : कसब्यात चार तासात सव्वाआठ टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba By Election

Kasba By Election : कसब्यात चार तासात सव्वाआठ टक्के मतदान

पुणे : कसबा विधानसभा मतदार संघात पहिल्या चार तासात केवळ सव्वा आठ टक्के मतदान झाल्यामुळे मतदारांचा पोटनिवडणुकीमधील निरुत्साह दिसून येत आहे. पुणे शहरात कसबा विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत एकूण दोन लाख ७५ हजार ६७९ इतके मतदान आहे.

भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर या दोघांमध्ये चुरशीची होत असल्यामुळे आपापल्या हक्काचा मतदार बाहेर काढण्यासाठी भाजपचे आणि काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. सकाळच्यावेळेत मतदान करून घेतण्यावर दोन्ही पक्षांकडून भर दिला जात आहे. पण मतदानाची टक्केवारी वाढताना दिसून आलेली नाही.

कसबा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते नऊ या वेळेत ६.५ टक्के मतदान झाले तर सकाळी नऊ ते ११ या वेळेत अवघे पावणे दोन टक्के मतदान झाल्याच्या समोर आले असून पहिल्या चार तासात एकूण ८.२५ चक्के मतदान झाले आहे.

यादीत मयतांची नावे आणि जिवंतांची गायब

मतदार याद्या अद्ययावत केल्या असे सांगितले गेलेले असले तरी यामध्ये मयत मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात आहेत. तर जिवंत असलेल्या मतदारांची नावे नसल्याने त्यांचा मतदानाचा हक्क हिरावला गेलेला आहे. दोन-तीन केंद्रांवर फिरून नाव आहे का याची चौकशी केली जात आहे.

पण नाव सापडत नसल्याने नाईलाजाने मतदान न करता नागरिकांना घरी जावे लागत असल्याचे समोर आले आहे. सुवर्णा कुलकर्णी म्हणाल्या, "गेल्या चार निवडणुकांपासून मी केळकर रस्त्यावरील कन्या शाळेत मतदान करत होते. पण आज सकाळी मतदानाला गेले असता माझं नाव यादीमध्ये नसल्याचे दिसून आले. या परिसरातील दोन-तीन केंद्रांवरून फिरून आले. पण एकाही ठिकाणी माझे नाव नसल्याने मतदान करता आलेले नाही.