Kasba Byelection : "गिरीशभाऊ…कसब्याचा गड तुम्ही..."; फडणवीसांनी ट्वीट केला बापटांचा भावनिक व्हिडीओ | Devendra Fadnvis Tweet Girish Bapat Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kasba byelection devendra fadnvis tweeted girish bapat imotional video pune politics

Kasba Byelection : "गिरीशभाऊ…कसब्याचा गड तुम्ही..."; फडणवीसांनी ट्वीट केला बापटांचा भावनिक व्हिडीओ

Pune Bypoll Election News : पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. या दोन्ही ठिकाणी मविआ आणि भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांकडून विशेष जोर लावला जात आहे.

तसेच भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख बनत चाललेल्या कसबा मतदार संघात भाजपने खासदार गिरीश बापट यांना आजारपणातही मैदानात उतरले आहे.यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापटांबद्दल केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे.

फडणवीस काय म्हणालेत..

पोटनिवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत देवेंद्र फडणवीस यांनी बापटांचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. सोबतच कसब्याचा गड बापट यांनीच मजबूत केला असे म्हटले आहे.

फडणवीसांनी लिहीलंय की, "असे खंबीर नेते, असे निष्ठावंत कार्यकर्ते हीच भाजपाची ताकद, हीच भाजपची ओळख. देश प्रथम, मग पक्ष, शेवटी स्वतः ! गिरीशभाऊ...कसब्याचा गड तुम्ही मजबूत केलात. इथल्या मनामनांत तुम्ही भाजपाचे कमळ रुजवले. मतदारराजा तुमचा शब्द राखल्याशिवाय राहणार नाही!"

विरोधकांचा हल्लाबोल..

कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचारात आजारी असलेल्या बापटांना उतरवण्यात आल्याने विरोधी पक्षांकडून टीका देखील होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी भाजपला धारेवर धरले आहे.

खासदार गिरीष बापट यांना आजारपणात प्रचारात उतरवून भाजप त्यांच्या जिवाशी खेळत आहे असे जगताप म्हणाले. कसबा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बापट यांनी केसरी वाड्यात पदाधिकाऱ्यासाठी मेळावा आयोजित केला होता.

जगताप पुढं म्हणाले, गिरीश बापट यांना गेल्या ५ वर्षांपासून भाजपने बाजूला ठेवलं. कसबा पोटनिवडणुकीचा उमेदवार धोक्यात आला आणि भाजपला त्यांची आठवण आली. बापट यांच्या जीवाशी खेळण्याचे काम भाजप करत आहे. पुणेकर यांना माफ करणार नाहीत