Pune News: पुणे तिथे काय उणे! धंगेकरांच्या विजयाचा जल्लोष थांबेना; आता हॉटेल चालकाची 'भन्नाट ऑफर' | kasba bypoll elaction Ravindra Dhangekar's victory BJP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravindra Dhangekar

Pune News: पुणे तिथे काय उणे! धंगेकरांच्या विजयाचा जल्लोष थांबेना; आता हॉटेल चालकाची 'भन्नाट ऑफर'

Pune News- अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवून भाजपला गडाला सुरुंग लावण्याची किमया करून दाखवली.

त्यांच्या विजयाने महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र पुण्यात धंगेकरांच्या विजयाचा जल्लोष सुरूच आहे.

पुणे तिथे काय उणे, असं नेहमीच म्हटलं जातं. त्याचाच प्रत्येय पुन्हगा एकदा आला आहे. रवींद्र धंगेकर जिंकल्याबद्दल एक रोलवर एक रोल फ्री, अशी ऑफर हॉटेल व्यावसायिकाकडून देण्यात आली आहे. कसबा पोटनिवडणुकीचा गुरुवारी निकाल लागला. यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला.

धंगेकर यांच्या विजयाबद्दल पुण्यातील एका व्याव्यासायिकाने एक अनोखी ऑफर ठेवली आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत असणाऱ्या एका हॉटेल व्याव्यासायिकाने एक रोलवर एक रोल फ्री अशी ऑफर ठेवली आहे. ही ऑफर २ दिवसांसाठी असून या ऑफरची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

जवळपास तीन दशकांनंतर काँग्रेसचा झेंडा कसबा विधानसभा मतदारसंघात फडकला. त्याच्यासोबत राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचा भगवाही दिमाखात फडकला.

कसब्यात जागोजागी महाविकास आघाडीचा विजयोत्सव साजरा झाला. रवींद्र धंगेकर यांचे कटआऊट घेऊन दुचाकीवरून फिरणाऱ्या उत्साही तरुणही कसब्यात लक्ष वेधून घेत होते.

टॅग्स :BjpPune NewsCongress