Kasba Bypoll Election : फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपचे शक्तीप्रदर्शन

नारायण पेठ, सदाशिव पेठेतून हा रोडशो जाताना फडणवीस यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत
Devendra Fadanvis
Devendra FadanvisEsakal

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना भाजप महायुतीने आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज रोड शो करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

नारायण पेठ, सदाशिव पेठेतून हा रोडशो जाताना फडणवीस यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करतानाच मतदारांनी फडणवीस यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास भिडे पूल येथून फडणवीस यांच्या रोडशोची सुरवात करण्यात आली.

पूर्वीच्या नियोजनानुसार नारायण पेठ, शनिवार पेठ, शनिवार वाडा, शिवाजी रस्ता या भागात प्रचार केला जाणार होता. पण यामध्ये बदल करत भिडे पूल, केसरीवाडा, रमणबाग चौक, शगून चौक, भानुविलास टॉकीज, पेरूगेट, टिळक रस्ता, खनिजा विहर, बाजीराव रस्त्यावरून महात्मा फुले मंडई असा रो शो करत सदाशिव, नारायण पेठेतील मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपने केला.

उघड्या जीपमधून रोड शोला सुरवात होताना भाजपचे प्रमुख डझनभर नेते दोन जीपमध्ये होते. फुलांची, रंगबिरंगी कागदांची उधळण फडणवीस, हेमंत रासने, चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेत्यांवर करण्यात आली. जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, मोदी मोदी, अयोध्या तो झाकी है, पुण्येश्‍वर अभी बाकी है...

विकासाचे केंद्र देवेंद्र देवेंद्र..., कसब्याची पसंत रासने हेमंत... अशा घोषणा रोडशो मध्ये सहभागी झालेल्या कार्कर्त्यांनी दिल्या. चौकांमध्ये क्रेनला मोठे हार लावून, जेसीबीतून, दुतर्फी असलेल्या इमारतींवरूनही नागरिकांनी फुलांचा वर्षाव करण्यात आला.

विद्यार्थ्यांनी दिल्या घोषणा

केळकर रस्त्यावरून पीएमपीच्या बसमध्ये शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनी होते. त्यांच्या जवळ फडणवीस येताच त्यांनीही मोदी मोदीच्या घोषणा देण्यास सुरवात केली. फडणवीस त्यांनी या लहान मुलांना प्रतिसाद दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com