Sun, June 4, 2023

Kasba Bypoll Election : आधी प्रचार आता मतदानासाठी आजारपणातही पोहोचले गिरीश बापट
Published on : 26 February 2023, 11:55 am
पुणे - पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान केले आहे. आजारी असताना सुद्धा बापट यांनी मतदानाला हजेरी लावली. अहिल्यादेवी शाळेत पोहचून बापट यांनी मतदान केले.
भाजपच्या प्रचारादरम्यान बापट यांनी आजारी असून स्वतः मैदानात उतरून पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला होता. यानंतर राष्ट्रीय अधिकार बजावण्यासाठी बापट हे मतदानासाठी पोहचले. कसबा निवडणूक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर मैदानात आहेत. भाजपने येथे टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे कसब्यात नाराजी असल्याच्या चर्चा सुरू होत्या.