Kasba Bypoll : पहिल्यांदा धंगेकर अन् आता रासने; दगडूशेठ गणपती मंडळाच्या गोडसेंचा युटर्न, म्हणाले... | Kasba Bypoll : ravindra Dhangekar Hemant Rasane; Uturn of Akshay Godse of Shrimant Dagdusheth Ganapati Mandal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

  ravindra Dhangekar Hemant Rasane

Kasba Bypoll : पहिल्यांदा धंगेकर अन् आता रासने; दगडूशेठ गणपती मंडळाच्या गोडसेंचा युटर्न, म्हणाले...

पुणे - श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळ उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचs उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिला होता. पुण्यात कसबा पोटनिडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून भारतीय जनता पक्ष तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र पाठिंबा दिल्यानंतर गोडसे यांनी युटर्न घेतला आहे.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिल्याने भाजप उमेदवार हेमंत रासने यांना मोठा धक्का मानला जात होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण हे असून दोन वर्षांपासून ट्रस्टच्या सरचिटणीसपदी कसबा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे आहेत. तर उत्सव प्रमुख प्रमुख अक्षय गोडसे हे आहे.

दरम्यान उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा दिल्याने गणेश मंडळामध्ये चर्चेला सुरवात झाली होती. मात्र लगेचच अक्षय गोसले म्हणाले की, "मी धगेकरांना पाठिंबा दिला नाही. आम्ही सदैव हेमंत रासने यांच्या सोबत आहोत" अक्षय गोडसे यांनी एक व्हिडिओ शेअर करून रवींद्र धंगेकारांना जाहीर पाठिंबा दिला होता.

याबाबत माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर गोडसेंनी आता यू टर्न घेतला आहे. गोडसे कुटुंबीय रासने यांच्याबरोबरच असल्याचा व्हिडिओ पुन्हा अक्षय गोडसेंनी शेअर केला आहे.

टॅग्स :BjpCongress