Kasba Bypoll result: रासनेंना तेंव्हाच इशारा दिला होता, पण...; बापटांचं 'ते' विधान चर्चेत | hemant Rasane was warned by girish Bapat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girish Bapat and Hemant Rasane

Kasba Bypoll result: रासनेंना तेंव्हाच इशारा दिला होता, पण...; बापटांचं 'ते' विधान चर्चेत

पुणे - अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी ११,०४० मतांनी भाजपा उमेदवार हेमंत रासनेंचा पराभव केला आहे. कसब्यात भाजपाचा पराभव होणार, असं भाकित वर्तवलं जात होतं. त्यातच रासनेंच्या प्रचारात आजारी असताना आलेल्या खासदार गिरीश बापट यांच्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे.

आजारी असूनही पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी प्रचारात सहभाग घेतला होता. गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली केसरीवाड्यात मेळावा पार पडला होता. थेट व्हीलचेअरवर बसून बापट प्रचारात उतरल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं.

गिरीश बापट यांनी अनेक वर्षे या मतदार संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामुळे त्यांचा शब्द कसब्यात महत्त्वपूर्ण ठरतो. शिवाय भाजपने ब्राह्मणेत्तर उमेदावर दिल्याने मतदार वेगळा निर्णय घेतील, याची शक्यता होती. त्यामुळे हेमंत रासनेंचा प्रचार करण्यासाठी खुद्द बापट समोर आले होते.

यावेळी बापट म्हणाले होते की, १९६८ नंतर प्रथमच मी या निवडणुकीत सक्रिय नाही. अनेक निवडणुका आपला पक्ष लढला. अनेकवेळा जिंकलो अनेकवेळा हरलो, पण पक्ष संघटन कायम राहिले. कार्यकर्त्यांनी चांगलं काम करा, कार्यकर्ता पक्षाचा आत्मा आहे.

दरम्यान हेमंतचे काम चांगले आहे, पण थोडं नागरिकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे, असंही बापट म्हणाले होते. त्यामुळे रासने नागरिकांपर्यंतच पोहचण्यात कमी पडले की, कसब्यातील नागरिकांनी बापटांच्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Pune NewsGirish BapatBjp