"माझ्यापेक्षा मोठी हार माझ्या मित्राची झाली"; बिचुकलेंनी फडणवीसांना डिवचलं! : Abhijeet Bichukale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abhijeet Bichukale

Abhijeet Bichukale: "माझ्यापेक्षा मोठी हार माझ्या मित्राची झाली"; बिचुकलेंनी फडणवीसांना डिवचलं!

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत उमेदवार अभिजीत बिचुकले यांना ४७ मतं मिळाली आणि त्यांचं डिपॉजिट जप्त झालं. यानंतर बिचुकले यांनी प्रतिक्रिया देताना पराभव मान्य असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर आपण आता लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी यावेळी जाहिर केलं. दरम्यान, कसब्यात माझ्यापेक्षा मोठी हार माझ्या मित्राची झाली, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून त्यांनी म्हटलं आहे. (Kasba ByPoll Result My friend Devendra Fadnavis lost more than me says Abhijeet Bichukale)

बिचुकले म्हणाले, "कसब्यात मला मत किती मिळाली हे महत्वाचं नाही. पण मी हारलो हे कबूल करतो हसतमुखानं. माझ्यापेक्षा मोठी हार जी झाली ती माझ्या मित्राची झाली देवेंद्र फडणवीस साहेबांची. उपमुख्यमंत्री असल्यानं मी त्यांना साहेब म्हणतोय. ते आमचे चांगले सहकारी आहेत खरंतरं. त्यांचा फार मोठा पराजय आहे हा, पण चर्चा सुरु झालीए बिचुकलेंची. म्हणजेच हममे कुछ जादाही अलग बात है"

या निकालावरुन हे स्पष्ट होतंय की, लोकांचं आणि माझंही विचारमंथन सुरु आहे. मी आता जाईन २०२४ ला दीडशे आमदार घेऊनच जाईन, असंही यावेळी अभिजीत बिचुकले म्हणाले आहेत.

हे ही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...