Kasba Bypoll Result : "१५ वर्षांनी ते स्वप्न पूर्ण झालं" ; धंगेकरांच्या पत्नीची भावूक प्रतिक्रिया! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pratibha Dhangekar

Kasba Bypoll Result : "१५ वर्षांनी ते स्वप्न पूर्ण झालं" ; धंगेकरांच्या पत्नीची भावूक प्रतिक्रिया!

Kasba Bypoll Result : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. धंगेकरांना ७२ हजार ५९९ तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मतं मिळाली आहेत. साधारण १० हजार ८०० मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत. त्यामुळे पुण्यात जल्लोषाचे वातावरण आहे. 

रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा रविंद्र धंगेकर यांनी जल्लोष साजरा केला. प्रतिभा धंगेकर यांनी कसबा गणपती मंदिरासमोर महिला कार्यकर्त्यांसोबत फुगडी घालून आनंद साजरा केला. १५ वर्षांनी स्वप्न पूर्ण झाले, अशी प्रतिक्रिया यावेळी प्रतिभा धंगेकर यांनी दिली. 


रवींद्र धंगेकर हे कसबा पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवार जाहीर झाल्यानंतर अनेक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे. 

कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. 'कसब्यातून रासने आणि धंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. या कसबा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. या निकालाचे पडसाद अधिवेशनात देखील उमटले आहेत.

टॅग्स :Pune News