Kasba-Chinchwad ByEelction: प्रचाराच्या तोफा थंडावल्या, रविवारी मतदान; काय आहे जनतेचा मूड? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kasba Bypoll Election 2023 News Updates

Kasba-Chinchwad ByEelction: प्रचाराच्या तोफा थंडावल्या, रविवारी मतदान; काय आहे जनतेचा मूड?

Kasba-Chinchwad ByEelction : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार अखेर आज संध्याकाळी ५ वाजता संपला. यानंतर रविवारी, २६ फेब्रुवारी रोजी दोन्ही मतदारसंघात मतदान पार पडेल. या दोन्ही मतदारसंघात जोरदार प्रचार पार पडला. भाजप-शिवसेनेसह महाविकास आघाडीचे सर्व दिग्गज नेत्यांनी इथं प्रचार सभा घेतल्या. त्यामुळं मतदान किती होईल आणि कोण निवडून येईल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Kasba Chinchwad ByEelction Campaign ends vote on Sunday)

दरम्यान, चिंचवडमध्ये भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आश्विनी जगताप तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्यासह काही अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. तर कसब्यात युतीचे उमेदवार हेमंत रासने आणि मविआचा रविंद्र धंगेकर तसेच आनंद दवे, अभिजीत बिचुकले आणि इतर अपक्ष उमेदवार यांच्यात लढत होणार आहे. पण दोन्ही मतदारसंघात युती आणि आघाडीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार पार पडला.

कसबा मतदारसंघात भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमध्ये भाजपचेच आमदार लक्ष्मण जगताप यांचं आजारपणामुळं निधन झालं. त्यानंतर या दोन्ही मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. चिंचवडमध्ये भाजपनं जगताप कुटुंबियातील व्यक्तीला उमेदवारी दिली पण कसब्यात टिळक कुटुंबियाला उमेदवारी दिली नाही. पण विरोधकांनी दोन्ही ठिकाणची निवडणूक बिनविरोध केली नाही.

टॅग्स :Pune News