
Kasba BJP News: कसब्यातील पराभव भाजपच्या जिव्हारी; मोठा बदल होण्याची शक्यता
Pune News: पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने पूर्ण शक्ती लावली होती. तरीही भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव झाला आहे. हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याचे कारणही तसेच आहे. (Kasba Peth New changes in Pune city BJP, ravindra dhangekar, Devendra Fadnavis, Eknath Shinde)
पुणे शहर भाजप कार्यकारणीत मोठे बदल होण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे. भाजपकडून महिना अखेरीस मोठे बदल होणार आहेत. कसबा विधानसभा निवडणुक पराभवानंतर भाजप ॲक्शन मोडवर आली आहे. भाजप केंद्रीय संघटनेच्या आदेशानुसार पुण्याचे शहराध्यक्ष बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आमदार सिद्धार्थ शिरोळे,मुरलीधर मोहोळ, धीरज घाटे, गणेश बिडकर मेधा कुलकर्णी यांच्या नावाची शहराध्यक्ष पदासाठी चर्चा सुरु आहे.
तब्बल २८ वर्षांनंतर काँग्रेसनं कसब्यात भाजपचा पराभव केला. कसबा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. मतमोजणीच्या 20व्या फेरीअखेर धंगेकर यांनी तब्बल 11 हजार मतांनी विजय मिळवला.
कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनानंतर येथे पोटनिवडणूक झाली.