काश्‍मीरमध्ये पाकला मोकळे रान - दुलत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

पुणे - ‘‘काश्‍मीरमधील तरुण आता पाकिस्तानऐवजी अल्लाहसाठी लढत आहेत. हिंसाचार वाढण्याबरोबरच २०१६ पासून काश्‍मीरमध्ये पाकिस्तानला मोकळे रान मिळाले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचा ‘संवादा’चा मार्ग सोडल्यामुळे काश्‍मीरमधील परिस्थिती वाईट झाली आहे. कधी नव्हे, ते काश्‍मीरला शांततेची ओढ लागली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची युती होऊन उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री होतील,’’ असे भाकीत भारतीय गुप्तचर संस्थेचे (रॉ) माजी प्रमुख अमरजितसिंग दुलत यांनी रविवारी वर्तविले.

काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात काश्‍मीरप्रश्‍न, पाकिस्तान, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काश्‍मीर धोरणातील फरकाबाबत दुलत यांनी भाष्य केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार अनंत गाडगीळ, विश्‍वस्त डॉ. महेश तुळपुळे या प्रसंगी उपस्थित होते. 

दुलत म्हणाले, ‘‘काश्‍मीरमध्ये हिंसाचाराच्या मार्गाला लागलेले शंभरपैकी सत्तर तरुण ‘जैश-ए-मोहंमद’, तर उर्वरित तीस तरुण ‘लष्कर-ए-तोयबा’ संघटनेसाठी काम करत आहेत. हिजबुल मुजाहिदिन संघटना जवळपास संपुष्टात आली आहे. मात्र हे तरुण आता पाकिस्तानसाठी नाही; तर अल्लाहसाठी लढत आहेत. वाजपेयी यांचा मार्ग सोडून भारताने चूक केली आहे. ’’

‘‘स्पष्ट बहुमत नसल्याने पीडीपी पक्षाच्या मेहबूबा मुफ्ती यांच्यासमोर भाजपशी युती करण्याशिवाय पर्याय नव्हता. उमर अब्दुल्ला आणि हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मीरवाइझ उमर फारुक यांनीही एकत्र आले पाहिजे,’’ असे दुलत यांनी सांगितले. 

२०१९ निवडणुकांनंतर ‘संवाद’ 
‘‘सध्याचे पाकिस्तानी लष्करप्रमुख मवाळ आहेत. त्यामुळे तिथे पुन्हा लष्करी उठाव होईल, असे वाटत नाही. मात्र भारताचे धोरण निश्‍चित नाही. सध्याचे नेतृत्व सर्व निर्णय निवडणूककेंद्रित घेत असल्यामुळे पाकिस्तानशी संवाद साधायचा की नाही हे सुद्धा २०१९ ची निवडणूक व त्याच्या निकालावरच ठरेल,’’ असे दुलत यांनी सांगितले.

Web Title: kashmir pakistan amarjitsing dulat