महाराष्ट्रातील पर्यटकांमुळेच काश्‍मीर नंदनवन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020


काश्‍मीरमधील व्यावसायिक, पहेलगाम हॉटेल अँड रेस्टॉरंट, शेरे काश्‍मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरचे शिष्टमंडळ पुण्यात आले आहे. तेथील स्थिती आणि पर्यटनासाठी अनुकूल वातावरणाबाबत त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. 

पुणे : "सीमेवर गोळीबार झाला म्हणजे संपूर्ण जम्मू-काश्‍मीर धोकादायक नाही. पर्यटनासाठी हे राज्य खूप सुरक्षित आहे. या राज्याच्या पर्यटनाच्या व्यवसायासाठी महाराष्ट्राचा खूप मोठा आधार आहे,'' अशी भावना काश्‍मिरातील पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केली. 

पुणे पोलिस पडले प्रेमात, पाहा कोण आहे Valentine?
काश्‍मीरमधील व्यावसायिक, पहेलगाम हॉटेल अँड रेस्टॉरंट, शेरे काश्‍मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरचे शिष्टमंडळ पुण्यात आले आहे. तेथील स्थिती आणि पर्यटनासाठी अनुकूल वातावरणाबाबत त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. असिफ इक्‍बाल बुर्झा, जावेद बक्षी, पुण्यातील 'सरहद'चे संजय नहार, ट्रॅव्हल एजंटस असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास केळकर, ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन ऑफ इंडियाचे बेहराम प. जादे आदी उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बुर्झा म्हणाले, "काश्‍मीर श्रीनगरपुरते मर्यादित नाही, असंख्य नवी पर्यटनस्थळे तिथे आहेत. सर्वच स्थळे सुरक्षित आहेत. काही घटनांनी भारताचे नंदनवन बदनाम झाले आहे; पण आजही हा प्रदेश खूप सुरक्षित आहे. पर्यटकांच्या मनात तणावाची भीती असते; पण पर्यटक आमचा दाता असल्याने त्यांना अजिबात धोका नाही.'' 

पुणे : ऍट्रोसिटीची भीती दाखवत उकळली 75 लाखाची खंडणी
बक्षी म्हणाले, "दहशतवादी कारवाया सीमाभागात होतात. इतर भाग सुरक्षित आहे. लोक पर्यटनासाठी येत आहेत, हॉटेल सुरू आहेत. केंद्राने 370 कलम रद्द केल्यानंतर पर्यटकांची संख्या कमी झाली; पण आता वाढ होत आहे. पर्यटकांचे आम्ही स्वागतच करीत आहोत. किती टक्‍क्‍यांनी पर्यटन कमी झाले, हे मात्र सांगता येत नाही.'' 

- पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

डॉ. केळकर म्हणाले, ""हल्ल्यांच्या घटना या पर्यटन स्थळांपासून कोसो दूर आहेत. अशा बातम्यांमुळे लोक घाबरतात. सीमेवरचा काही भाग म्हणजे संपूर्ण काश्‍मीर नाही. बहुतांश पर्यटनस्थळे सुरक्षित आहेत.''

एसटी महामंडळाच्याही आता "ई-बस' 

पन्नास टक्‍के पर्यटक महाराष्ट्रातील 

काश्‍मीरच्या पर्यटन स्थळाला महाराष्ट्राचा आधार राहिला आहे. या राज्यात वर्षभरात पर्यटनासाठी जेवढे लोक येतात, त्यापैकी पन्नास टक्के लोक महाराष्ट्रातील आहेत. अनेक लोक काश्‍मीरमध्ये जाऊन आल्यानंतर हा प्रदेश किती सुरक्षित आहे, हे सांगतात. म्हणूनच अन्य लोकांनी काश्‍मीरविषयी भीतीची भावना बदलावी, असे बक्षी यांनी सांगितले.

खासगी बसगाड्यांना पालिका लावणार ‘जॅमर’

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kashmir Is paradise because of tourists in Maharashtra