सायकलवरून बारा दिवसांत काश्‍मीर ते पुणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

पुणे - काश्‍मीर ते पुणे...एक आव्हानात्मक वाट...24 हजार किलोमीटर...पण, अवघ्या 12 दिवसांत हे अंतर सायकलवरून पूर्ण करणारे पाच पुणेकर...सोबत "स्वच्छतेचा' अन्‌ "पर्यावरणसंवर्धना'चा संदेश घेऊन केलेला हा थरारक प्रवास...आत्मविश्‍वास, जिद्द आणि धैर्याचा अनोखा संगम...ही अशक्‍य असलेली गोष्ट करून दाखवली आहे धर्मेंद्र लांबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी. सीमेवर तैनात असलेल्या जवानांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी अन्‌ स्वच्छतेचा जागर संपूर्ण भारतभर पोचविण्यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न.

काश्‍मीर ते पुणे या प्रवासातील आव्हाने पेलून त्यांनी केलेला हा पराक्रम वाखाणण्याजोगा आहे. सायकलिंग कोच लांबा यांच्यासह गोरख काळखैरे, मनोज भिसगे, सुनील सदीगळे आणि राम चौधरी यांनी हा सायकलचा प्रवास केला; परंतु राम चौधरी यांनी शारीरिक दुखापतींमुळे आपला प्रवास उदयपूर येथे स्थगित केला. हा प्रवास 14 नोव्हेंबर रोजी जम्मू येथील पटनीटॉप येथून सुरू झाला. सात राज्यांमधून प्रवास करत 26 नोव्हेंबर रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे संपला.
काळखैरे म्हणाले, ""मागील दोन वर्षांचा सायकलिंगचा अनुभव कामी आला. या अनुभवाच्या बळावर परिस्थितीशी सामान करत हा प्रवास केला आणि यशस्वी ठरलो. हा प्रवास आनंददायी होता.''

भिसगे यांच्या म्हणण्यानुसार, ""पहिल्यांदाच एवढा लांबचा प्रवास अनुभवल्याने एक नवी ऊर्जा मिळाली. स्वच्छता, सायकलचे महत्त्व नागरिकांना सांगत आम्ही हा प्रवास अनुभवला.''

एवढे अंतर पार करणे आमच्यासाठी एक आव्हान होते. प्रत्येक दिवशी दोनशे किलोमीटरचे अंतर गाठावे लागले. सकाळी लवकर उठून प्रवासाला सुरवात करायचो. प्रत्येक दिवशी नवीन ठिकाणी मुक्काम असायचा. अडचणींना तोंड देत हा यशस्वी प्रवास केला.
- धर्मेंद्र लांबा, सायकलिंग कोच

Web Title: Kashmir to Pune by Cycle