वॉटरकप स्पर्धेसाठी कटफळच्या नागरिकांचे श्रमदान, सुनेत्रा पवार सहभागी

मिलिंद संगई
सोमवार, 16 एप्रिल 2018

बारामती (पुणे) : सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेअंतर्गत पाणी फाऊंडेशनद्वारे सुरु असलेल्या स्पर्धेसाठी आज तालुक्यातील कटफळ येथे ग्रामस्थांनी श्रमदान केले. सलग समतल चर खोदाईचे काम माथा ते पायथा करण्याचे काम येथे सुरु झाले आहे. बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनीही आज कटफळ येथे भल्या सकाळी हजेरी लावत श्रमदानात सक्रीय सहभाग दिला.

गेले दोन तीन दिवस सुनेत्रा पवार या श्रमदानात सहभागी होत असून त्यांनी या उपक्रमासाठी पाणी फाऊंडेशनला सर्वतोपरी सहकार्य केले आहे. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाचे स्वयंसेवकही ग्रामस्थांसमवेत आज या श्रमदानात सहभागी झाले होते. काल जळगाव सुपे येथेही सुनेत्रा पवार श्रमदानात सहभागी झाल्या होत्या. 

Web Title: katfal villagers involved in watercup competition