कात्रज नव्या बोगद्याच्या मार्गावर पाणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

भोर - कात्रज घाटातील नव्या बोगद्याच्या मार्गावर शनिवारी (ता.17) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील माती, दगड व कचरा रस्त्यावर आला. जांभूळवाडी (ता. हवेली) हद्दीत डोंगरावरून आलेले पावसाचे पाणी धबधब्यासारखे पडत होते. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली. महामार्गावरून वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागली. खासगी व्यावसायिकांनी तयार केलेल्या रस्त्यावरील दगडमाती पावसाच्या पाण्यात महामार्गावर आल्याने वाहनचालकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली. पुणे बाजूकडून सातारा बाजूकडे जाणाऱ्या वाहनचालकांना जास्त त्रास सहन करावा लागला.

भोर - कात्रज घाटातील नव्या बोगद्याच्या मार्गावर शनिवारी (ता.17) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील माती, दगड व कचरा रस्त्यावर आला. जांभूळवाडी (ता. हवेली) हद्दीत डोंगरावरून आलेले पावसाचे पाणी धबधब्यासारखे पडत होते. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली. महामार्गावरून वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागली. खासगी व्यावसायिकांनी तयार केलेल्या रस्त्यावरील दगडमाती पावसाच्या पाण्यात महामार्गावर आल्याने वाहनचालकांच्या अडचणीत आणखीनच भर पडली. पुणे बाजूकडून सातारा बाजूकडे जाणाऱ्या वाहनचालकांना जास्त त्रास सहन करावा लागला. कात्रजच्या जुन्या बोगद्याच्या मार्गावरही काही प्रमाणात पाणी आले होते. कात्रज घाटाच्या पुणे बाजूला मुसळधार पाऊस झाला असला तरी घाटाच्या सातारा बाजूला पावसाचा थेंबही पडला नव्हता.

Web Title: katgraj ghat marathi news pune news maharashtra news monsoon news