#TrafficIssue जड वाहनांमुळे कात्रज चौक असुरक्षित

#TrafficIssue जड वाहनांमुळे कात्रज चौक असुरक्षित

पुणे - पुण्याचे दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणून कात्रज चौक ओळखला जातो. तीव्र उतार, बसस्थानक, प्रवासी वाहनांचे थांबे, रिक्षा स्टॅंड आणि पादचाऱ्यांची वर्दळ, असे या चौकाचे वैशिष्ट्य. बाह्यवळण रस्त्यामुळे या चौकात जड वाहनांची वर्दळ मोठी असते; विविध प्रकारच्या वाहनांच्या संख्येमुळे पोलिसांची संख्या तोकडी पडते, असा रोजचा अनुभव आहे.

या चौकातील वारंवार बंद पडणाऱ्या सिग्नलमुळे वाहतुकीचा खेळखंडोबा होतो अन्‌ कोंडीमुळे वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे पादचारीही भेदरलेल्या अवस्थेत असुरक्षितपणे रस्ता ओलांडतात. दुचाकी वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडते. शहरात उड्डाण पूल, ग्रेडसेपरेटरची रेलचेल करण्यास इच्छुक असलेले महापालिकेचे सत्ताधारी या चौकात उड्डाण पूल, ग्रेडसेपरेटरकडे दुर्लक्ष करतात. परिणामी या चौकातील वाहतूक दिवसेंदिवस असुरक्षित होऊ लागली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com