अंगातून घामाच्या धारा आणि पोलिसांचा ससेमिरा

कात्रज बायपास महामार्ग : बायपासवर वाहनचालकांनी मांडली व्यथा
Katraj Mantarwadi bypass road traffic update pune
Katraj Mantarwadi bypass road traffic update pune sakal

उंड्री : अरुंद रस्ता, वाहनांची खच्चून गर्दी, उन्हाच्या झळया, पत्र्याची केबिन तापलेली, अंगातून घामाच्या धारा आणि पोलिसांचा ससेमिरा अशा एक ना अनेक समस्यांशी सामना करण्याऐवजी वाहन चालवायलाच नको, अशी भावना कात्रज-मंतरवाडी बायपास मार्गावर वाहने चालविणाऱ्या ट्रकचालकांनी व्यक्त केली. रस्ते विभागाने कात्रज बायपास महामार्गावर रखडलेले रुंदीकरण, रस्त्यालगत विद्युत खांब हटवून वाहतुकीसाठी रस्ता खुला करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

ट्रकचालक अवदेश पांडे, शैलेंद्र दुबे म्हणाले की, कात्रज बायपास महामार्गावर गावांच्या ठिकाणी गतिरोधकांबरोबर स्थानिकांच्या वाहनांची घुसखोरी, दमबाजीमुळे ड्रायव्हर म्हणून नोकरी करायलाच नको असे झाले आहे. वाहतूककोंडी झाली की, महामार्गालगतच्या गावातील वाहनचालक अचानक पुढे येतात आणि दमबाजी करतात. उन्हामुळे गाडीच्या केबिनचा पत्रा तापतो, अंगातून घामाच्या धारा सुरू असतात, वाहतूककोंडीतून सावरत असतानाच पोलीस येतात, एखाद्या चालकाने चार-दोन प्रवासी घेतले की, पोलीस धारेवर धरतात, कागदपत्रे दाखवण्यासाठी वाहन बाजूला घ्यावे लागते. वाहन उभे करण्यासाठी जागा नसते, कागदपत्रामध्ये काही त्रुटी आढळली की, भली मोठी दंडाची रक्कम सांगितली की जीव नकोसा होतो.

स्कूल बसचालक शंकर मिसेकर, राहुल काळभोर, अभय कुलकर्णी म्हणाले की, रस्त्यावरील खड्ड्यांच्या गर्दीमुळे वाहनांचा मेन्टेन्स वाढू लागला आहे, अॅव्हरेज कमी मिळते, उन्हामुळे वाहने गरम होतात, खड्ड्यांमुळे पाठीचा मणक्याचा त्रास वाढला आहे, ट्रक आणि बसला धडीचे काम निघते, टायर चिरतात, पायाला त्रास होतो. वाहतूककोंडीमध्ये सतत स्टेअरिंग फिरवावी लागत असल्याने हात भरून येतात. बससाठी तीन, सहा आणि एक वर्षासाठी रोड टॅक्स भरावा लागतो. कोरोना महामारीमुळे स्कूलबस बंद होत्या, तरीसुद्धा रोड टॅक्स माफ करणे अपेक्षित होते. मात्र, तोही भरावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com