कात्रज : अश्लिल बोलल्याच्या रागातून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

पत्नीवर वाईट नजर ठेवून तिला वारंवार त्रास दिला आणि तिच्याशी अश्लिल बोलल्याच्या रागातून खून केल्याची घटना घडली.

कात्रज : अश्लिल बोलल्याच्या रागातून खून

कात्रज - पत्नीवर वाईट नजर ठेवून तिला वारंवार त्रास दिला आणि तिच्याशी अश्लिल बोलल्याच्या रागातून महादेव दुपारगुडे याचा खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. १९) दहिहांडीच्या दिवशी जांभुळवाडी दरीपूलाच्या जवळ घडली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी पुढील ४८ तासात तपासयंत्रणा कामाला लावत खूनाचा छडा लावला असून तुषार मेटकरी, आशा मेटकरी, विनोद दुपारगुडे आणि किरण चौधरी यांना अटक केली आहे.

सदरची कामगिरी वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरिक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन शिंदे, धिरज गुप्ता, गौरव देव, अंकुश कर्चे, रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, नरेंद्र महांगरे, अवधुत जमदाडे, तुळशीराम टेभुर्णे आदीच्या पथकाने केली. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ करत आहेत.

Web Title: Katraj Murder Out Of Anger Speaking Obscenities Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimemurderkatrajArrested