कात्रज-नारायणपूर बस सुरू - तापकीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

गराडे - श्री क्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे राज्यभरातून भाविक येतात. गाणगापूरइतकेच महत्त्व नारायणपूरला आहे. या शिवाय केतकावळ्याचे बालाजी मंदिर, पुरंदर किल्ला व कोडीतचे श्रीनाथ-म्हस्कोबा मंदिर या मार्गावर आहे. त्यामुळे कात्रज-कोडीत-नारायणपूर बससेवेचा पर्यटक व भाविकांना फायदा होणार आहे, असे आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले.

नारायणपूर येथे आज दत्तजयंती सोहळ्याच्या प्रारंभी नारायण महाराज, आमदार तापकीर, ‘पीएमपी’चे संचालक सिद्धार्थ शिरोळे व जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दिगंबराऽ दिगंबराऽऽच्या जयघोषात कात्रज-नारायणपूर बसचे पूजन करण्यात आले.  या वेळी पुण्याच्या नगरसेविका संगीता ठोसर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गिरीश जगताप, भारतीय जनता पक्षाचे सासवड शहराध्यक्ष साकेत जगताप, बाळासाहेब चव्हाण, हरिभाऊ लोळे,  नदीम इनामदार, बाळासाहेब नेटके, भरत क्षीरसागर, रामभाऊ बोरकर, सदानंद बोरकर उपस्थित होते.

बसचे वाहक रवींद्र महाजन, चालक रोहिदास इंगुळकर यांचा सत्कार करण्यात आला. कोडीत येथे ट्रस्टचे विश्वस्त संतोष बडदे, चांबळी येथे सरपंच संगीता कामठे, उपसरपंच संभाजी शेंडकर, भाऊसाहेब कामठे, ग्रामसेवक रमेश राऊत आदींनी स्वागत केले. 

दरम्यान, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनीही या बससेवेसाठी प्रयत्न केल्याचे यादव यांनी सांगितले. सासवड-कात्रज बस सेवेला आज एक वर्षे पूर्ण होत असल्याचे जगताप यांनी सांगितले.

Web Title: katraj narayanpur Bus Bhimrao Tapkir