साठलेल्या कचऱ्याचे करायचे काय?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

कात्रज - संतोषनगर परिसरात नागराज मंदिराच्या दक्षिणेकडील भागात गेली तीन-चार दिवसांपासून कचरा संकलनासाठी घटांगाडी फिरकली नाही. यामुळे घराघरांत कचरा साचला असून, आता तो रस्त्याच्या कडेला पडू लागला आहे. या कचऱ्याचे करायचे काय, असा प्रश्‍न परिसरातील महिलांनी उपस्थित केला आहे. 

कात्रज - संतोषनगर परिसरात नागराज मंदिराच्या दक्षिणेकडील भागात गेली तीन-चार दिवसांपासून कचरा संकलनासाठी घटांगाडी फिरकली नाही. यामुळे घराघरांत कचरा साचला असून, आता तो रस्त्याच्या कडेला पडू लागला आहे. या कचऱ्याचे करायचे काय, असा प्रश्‍न परिसरातील महिलांनी उपस्थित केला आहे. 

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ४०मध्ये ही समस्या अनेक ठिकाणी भेडसावत आहे. या भागातील अरुंद रस्ते आणि गल्ल्यांमध्ये घंटा गाडी जात नाही. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, ज्या ठिकाणी घंटा गाडी थांबते; त्या ठिकाणी जाऊन नागरिक कचरा जमा करतात. मात्र नागराज मंदिर परिसरातील विघ्नहर्ता इमारतीच्या परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून घंटा गाडी आली नाही. यामुळे घराघरांत साठलेल्या ओल्या कचऱ्याची दुर्गंधी पसरू लागली आहे. बहुतांशी जणांनी सोईस्कर जागा शोधून रस्त्यावर कचरा फेक केली आहे. कचरा वेचकांच्या अनियमितपणामुळे नागरिकांची शिस्त आता बिघडून लागली आहे. 

ओला कचरा कुजण्याची प्रक्रिया वेगाने होत असल्यामुळे त्या तत्परतेने तो उचलण्याची सोय असली पाहिजे. गैरहजर वेचकांसाठी पर्यायी वेचकांचीही व्यवस्था करणे गरजेचे आहे. दांडी बहाद्दर वेचकांवर कारवाई होत नसल्यामुळे त्यांच्यावर धाक उरलेला नसल्याचे बोलले जात आहे. कचरा संकलनासाठी घंटागाडी नियमित नियमित आली पाहिजे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

संतोषनगरमधील विघ्नहर्ता परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून कचरा संकलनासाठी घंटा गाडी आली नाही. यामुळे घरांमध्ये ओला कचरा साचून आता दुर्गंधी पसरू लागली आहे. काही ठिकाणी कचरा रस्त्यावर टाकला जात आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
-अश्‍विनी भोसले, रहिवासी

क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात विभागवार आढावा घेऊन अनियमित कचरा वेचकांवर कारवाई केली जाणार आहे. कचरा वेचक न आल्यास नागरिकांनी क्षेत्रीय कार्यालयाला तत्काळ माहिती दिली पाहिजे.
- चंद्रकांत लाड, 
  आरोग्य निरीक्षक, धनकवडी क्षेत्रीय कार्यालय

Web Title: katraj news garbage issue