वैद्यकीय व्यावसायिकांनी संशोधन करावे - प्रतापराव पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

कात्रज - ‘‘वैद्यकीय क्षेत्रातील सर्व पॅथींमध्ये सामर्थ्य आहे, वैद्यकीय व्यावसायिकांनी अधिकाधिक माहिती संकलित करून त्यामध्ये संशोधन करण्याची आवश्‍यकता आहे,’’ अशी अपेक्षा ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केली.

पुणे डॉक्‍टर्स असोसिएशनच्या ‘तेजोमय’ या दिवाळी अंकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. जगन्नाथ दीक्षित, साहित्यिक अच्युत गोडबोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यानिमित्ताने ‘पीडीए’च्या वेबसाइटचा प्रारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

पवार म्हणाले, ‘‘तेवीस तास काम करा; मात्र एक तास स्वतःसाठी काढा आणि व्यायाम करा. वेळेचे नियोजन जो करू शकत नाही, तो यशस्वी होऊच शकत नाही. स्वतःसाठी वेळच नाही, मी प्रचंड बिझी आहे, असे म्हणणे योग्य नाही. योग्य डॉक्‍टर योग्यवेळी मिळणे हा योगायोगाचा भाग आहे. तसा योगायोग सर्वांच्याच बाबतीत अशक्‍य आहे.’’ वैद्यकीय व्यावसायिकांना वैयक्तिक प्रगतीत अडचणी येत असतील, तर अनेकजणांनी एकत्र येऊन रुग्णालयाची उभारणी करावी; कारण असे प्रयोग सध्या यशस्वी होत आहेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

ज्या- ज्या देशांत सुबत्ता येऊ लागली, तसे त्या देशांतील नागरिकांचे वयोमानही वाढू लागले. परंतु, त्याचबरोबर स्थूलतेची समस्या वाढली. यासह निर्माण होत असलेल्या अनेक आरोग्य समस्यांवर मात करण्यासाठी आपण काळजीपूर्वक आपले आरोग्य उत्तम राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन पवार यांनी केले. 

‘मधुमेहमुक्त भारत’ या अभियानाचे प्रचारक डॉ. जगन्नाथ देशमुख यांनी मधुमेहापासून मुक्तीसाठी घ्यावयाच्या काळजीबाबत माहिती दिली. गोडबोले यांची प्रकट मुलाखत उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली. पुणे डॉक्‍टर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश माने यांनी स्वागत केले, तर अध्यक्ष डॉ. संभाजी करांडे यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी डॉ. सुनील जगताप, डॉ. सचिन केदार, डॉ. मनोहर जाधव, डॉ. स्मिता घुले, डॉ. सचिन भालेराव, डॉ. जितेंद्र जाधव, डॉ. कविता ढमाले, असोसिएशनचे सभासद आणि माजी अध्यक्ष उपस्थित होते.

Web Title: katraj pune news Do research by medical practitioners