कात्रजला तरुणाचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

कात्रज - आगम टेकडीच्या पायथ्याला गोल टेकडी परिसरात एका तरुणाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. धारदार शस्त्राने त्याच्या डोक्‍यावर, चेहरा आणि हातावर वार करण्यात आले होते.

कात्रज - आगम टेकडीच्या पायथ्याला गोल टेकडी परिसरात एका तरुणाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. धारदार शस्त्राने त्याच्या डोक्‍यावर, चेहरा आणि हातावर वार करण्यात आले होते.

शानू छमन्न खान (वय 32, रा. संतोषनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ शारीक छमन्न खान (वय 28) याने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोषनगर परिसरात खान कुटुंबीय वास्तव्याला आहे. आईसह तीन भाऊ एकत्र राहत होते. मृत शानू मद्याच्या आहारी गेला होता. पत्नीसह कुटुंबीयांनाही वारंवार त्रास देत होता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला वेगळे राहण्यास सांगितले होते. तो त्याच परिसरात भाड्याच्या खोलीत राहात होता. गेल्या चार महिन्यांपासून त्याची पत्नी फरजाना ही शिंदेवाडी येथे राहात होती.

तेव्हापासून शानू मद्यधुंद होऊन कात्रज परिसरात भटकत होता. तो बस स्थानकातच झोपायचा. बुधवारी रात्री तो मूळ घरी परत आला. पाऊस पडत असल्याने आईने त्याला घरात घेऊन जेवण दिले आणि तो तेथेच झोपला. गुरुवारी पहाटे तो कोणालाही न सांगता घरातून निघून गेला. त्याच रात्री त्याचा अज्ञाताकडून खून झाला. सहायक निरीक्षक शेखर शिंदे पुढील तपास करत आहेत.

Web Title: katraj pune news murder in katraj