Katraj Zoo : कात्रज प्राणी संग्रहालयाची कोरोनानंतर वर्षपूर्ती! वर्षभरात विक्रमी उत्पन्न

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४ मार्च २०२० रोजी बंद करण्यात आलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय २० मार्च २०२२ रोजी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.
Katraj zoo Crowd
Katraj zoo Crowdsakal
Summary

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४ मार्च २०२० रोजी बंद करण्यात आलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय २० मार्च २०२२ रोजी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.

कात्रज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४ मार्च २०२० रोजी बंद करण्यात आलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय २० मार्च २०२२ रोजी पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर आलेली उन्हाळी सुटी आणि अनेक दिवसांपासून प्राण्यांना बघण्याची असेली इच्छा यामुळे प्राणी संग्रहालयात भेट देण्यासाठी लहान मुलांसह अबालवृद्धांनी गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

प्राणी संग्रहालायाला भेट देणाऱ्या पर्यटकांनी वर्षभरात संख्येचे अनेक नवनवीन विक्रम केल्याचे पाहायला मिळाले. गेल्या वर्षभरात म्हणजे २० मार्च २०२२ ते २० मार्च २०२३ या कार्यकाळात प्राणी संग्रहालयाला एकूण ७ कोटी ६९ लाख १२ हजार ४७७ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामध्ये तिकीटदरांतून मिळालेले उत्पन्न हे ७ कोटी ४६ लाख ३५ हजार ८६७ रुपयांचे तर इलेक्ट्रिक बॅटरीवरील गाडीसाठी आकारण्यात आलेल्या दरातून २२ लाख ७६ हजार ६१० रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.

पर्यटकांनी या वर्षभरात अभूतपूर्व गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. या काळात एकूण २१ लाख ६३ हजार ८६६ पर्यटकांनी भेट दिली. यामध्ये १५६३ परदेशी पर्यटकांनीही भेट दिली. एका वर्षभरात पर्यटकांनी भेट दिलेल्या संख्येचा हा उच्चांक आहे. कोरोनाच्या आधी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी भेट दिली नसल्याची माहिती प्राणीसंग्रहालय प्रशासनाने दिली आहे. गेल्या वर्षभरात सुटीच्या दिवशी २० ते २५ हजारांपर्यंत पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यातून प्राणी संग्रहालयाला दरदिवशी पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

Katraj zoo Crowd
Pune Crime : धावत्या रेल्वेतून पत्नी, मुलीला ढकलले; मुलीचा मृत्यू, आरोपी पतीला अटक

प्रतिक्रिया

कोरोना काळात प्राणी संग्रहालय बंद होते. मात्र, त्यानंतर खुले झाल्यानंतर पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयाला भेट देऊन पुर्ण आनंद घेतल्याचे गर्दीच्या आकड्यावरून दिसते. आम्हीही पर्यटकांना पूर्णपणे संतुष्ट करण्यासाठी कायम प्रयत्नशील असतो. प्राणीसंग्रहालयात सातत्याने नवनवीन प्राणी आणण्यांवर आमचा भर आहे. वाघ, सिंह, हत्ती, बिबट्या, यासह रानमांजर, वाघाटी, शेकरु असे अनेक प्राणी प्राणी संग्रहालयात आहेत. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे.

- राजकुमार जाधव, संचालक, राजीव गांधी प्राणी संग्रहालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com