पुणे - तुम्हाला कोरोना झाला होता का? कोरोना बरा झाल्यानंतरही काही त्रास तुम्हाला जाणवतोय का? या प्रश्नांची उत्तरे ‘हो’ असल्यास तुम्ही ‘कोविड कवच’ हे ॲप आवर्जून डाउनलोड करा. कारण, तुमच्या प्रकृतीबद्दलच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर यात मिळेल.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. त्याचे औपचारिक उद्घाटन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाचे उपचार घेऊन रुग्णालयातून घरी गेलेल्या कोरोनामुक्त नागरिकांसाठी हे ॲप महत्त्वाचे आहे. अशा नागरिकांना प्रकृतीबद्दल वेळोवेळी अडचणी जाणवतात. विशेषतः मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार अशा विकारांवर कोरोनाचा दूरगामी परिणाम झालेला दिसतो. त्यामुळे कोरोनामुक्त नागरिकांच्या मनात याबद्दल अनेक शंका आहेत. या सर्व शंकांचे समाधान करणारी उत्तरे या ॲपमध्ये देण्यात आली आहेत.
याचे वैशिष्ट्य म्हणजे, एकाच कुटुंबातील काही व्यक्ती एक मोबाईल वापरून हा ॲप वापरू शकतात. या ॲपमधून संकलित झालेली माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध वैद्यकीय शाखांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संशोधनासाठी उपयुक्त ठरणार आहे.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे आणि कान, नाक, घसा विभागातील प्राध्यापक व उपअधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी पुढाकार घेऊन हे ॲप विकसित केले आहे. डॉ. रमेश भोसले, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. संजय गायकवाड, डॉ. आरती किणीकर, डॉ. शशिकला सांगळे, डॉ. सुरेखा शिंदे आणि डॉ. लीना नकाते सहभागी झाल्या होत्या.
काय आहे ॲपमध्ये?
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.