'काव्यकलश' हे हिंदी-उर्दू कवि संमेलनाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

हिंदी-उर्दू भाषांतील गोडी आणि संवेदना काही फंकार आपल्या जबानीतून यावेळी पेश करतील.  

शहरात स्वतंत्र थिएटर प्रस्तुत 'काव्यकलश' हे हिंदी-उर्दू कवि संमेलन लवकरच सादर होणार आहे. संत कबीर ते गुलजार यांच्या कविता आणि शायरींनी या संमेलनाची मैफिल रंगणार आहे.

येत्या शनिवारी 5 मे ला सायंकाळी 5:30 ते 8:00 या वेळेत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रेम रस ते वीर रस अशा सगळ्याच प्रकारातील कविता आणि शायरींचा आस्वाद येथे घेता येईल. हिंदी-उर्दू भाषांतील गोडी आणि संवेदना काही फंकार आपल्या जबानीतून यावेळी पेश करतील.  

या संमेलनाला प्रवेश फ्री आहे. पुण्यातील बी एम सी सी रोड वरील श्री मंदीर जैन विद्यालयातील ओपन एअर थिएटर मध्ये हे संमेलन होईल. अधिक माहितीसाठी आशिष शुक्ला 9527461006, सत्यम श्रीवास्तव 9028173589 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Kavyakalash hindi urdu kavi sammelan