केडगाव टोल बंद करण्याचा विसर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

केडगाव - टोलमुक्त महाराष्ट्रचे आश्‍वासन देत भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेवर आले. सरकारने अनेक ठिकाणचे टोल बंदही केले. मात्र, सरकारला केडगाव (ता. दौंड) टोलचा विसर पडला आहे. शिरूर-सातारा महामार्गावरील येथील टोल नाक्‍यातून रोज १७०० जड वाहने जात असल्याची माहिती पुढे आली आहे.

केडगाव टोलचे टेंडर तीन महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. त्या वेळी नगर व औरंगाबाद येथील टोल कंपन्यांनी या रस्त्याचा सर्व्हे केला होता. त्या वेळी २४ तासांत सुमारे १७०० जड वाहने या टोल नाक्‍यातून जात आहेत. या आकड्यावरून केडगाव टोलमध्ये किती माया गोळा होते, हे लक्षात येते. या टोल नाक्‍यातील उत्पन्नातून सरकारला रोज तीस हजार रुपये मिळत आहेत.

त्यामुळे हा टोल चालू आहे. सन २००२ पासून या टोलला  अनेक वर्षे मुदतवाढ देत या टोल नाक्‍याशी संबंधित बहुतांश अधिकाऱ्यांनी आपले हात ओले करून घेतले आहेत. सरकारला आणि अधिकाऱ्यांना पैसे मिळत आहेत. मात्र, येथे वाहनमालकांची लूटच होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. हा टोल नाका कधी बंद होणार असा सवाल या भागातील वाहन चालकांनी केला आहे.

टोल व्यवस्थापन पुलावरील खड्डे बुजवत नाही. रस्त्यावर आलेली काटेरी झुडपे काढत नाही. गेल्या वर्षी पुलावर पडलेले खड्ड्यात पडून अपघात होऊ लागल्याने स्थानिक तरुणांनी खड्डे बुजविले होते. साइडपट्ट्याही खचलेल्या आहेत.

Web Title: Kedgaon Toll issue