केडगाव टोलनाका बंद, सकाळच्या पाठपुराव्याला यश

रमेश वत्रे
सोमवार, 17 डिसेंबर 2018

केडगाव, (पुणे) शिरूर-सातारा मार्गावरील केडगाव(ता.दौंड) येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी घेण्यात येत असलेली पथकर वसुली सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आज सोमवारपासून बंद करण्यात आली. हा टोल बंद करावा यासाठी दैनिक 'सकाळ' व आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे चालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान वीज कंपनीने टोलनाक्यावरील वीज पुरवठा आज सकाळी खंडीत केला. 

केडगाव, (पुणे) शिरूर-सातारा मार्गावरील केडगाव(ता.दौंड) येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी घेण्यात येत असलेली पथकर वसुली सर्व प्रकारच्या वाहनांसाठी आज सोमवारपासून बंद करण्यात आली. हा टोल बंद करावा यासाठी दैनिक 'सकाळ' व आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे चालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान वीज कंपनीने टोलनाक्यावरील वीज पुरवठा आज सकाळी खंडीत केला. 

तालुक्यात केडगाव टोलनाकाच्या विषय आज चर्चेचा राहिला. याबाबत अनेक नागरिकांनी 'सकाळ'चे अभिनंदन करून आभार मानले. पुणे जिल्ह्यात दौंड, केडगाव, फुरसुंगी, जेजुरी येथील रेल्वे मार्गावर रस्ते विकास महामंडळाने उड्डाण पुल बांधले होते. यापैकी केडगाव वगळता अन्य टोल नाके काही वर्षापुर्वी बंद झाले होते. केडगाव येथे टोल वसुली झाली नसल्याचे कारण देत सतत मुदतवाढ घेण्यात आली होती. एप्रिल महिन्यात पुढील तीन वर्षाची टोल वसुलीची निविदा महामंडळाने काढली. ही निविदा काढल्यापासून दैनिक 'सकाळ'ने याचा सतत पाठपुरावा केला. 

'सकाळ'मधील वृत्त मालिकेची दखल घेत आमदार कुल यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चौकशी आदेश दिले होते. निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर पाच ठेकेदारांनी निविदा भरल्या होत्या. मात्र 'सकाळ'मधून सतत वृत्त येत राहिल्याने महामंडळाने तीन वर्षांची निविदा स्थगित करत तात्पुरते काही महिन्यांची मुदतवाढ देत आतापर्यंत पथकर वसुली चालविली होती. अखेर रस्ते विकास महामंडळाने टोल कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला. महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी टोल बंद करण्याचा निर्णय संबंधितांना कळविला आहे.  

केडगावचा टोल 17 एप्रिल 2003 रोजी चालू झाला. हा रेल्वे उड्डाणपुल बांधण्यास नऊ कोटी 17 लाख तीन हजार 445 रूपये खर्च आला होता. नफ्यात असणारा टोल वारंवार तोटयात दाखवून विविध ठेकेदारांनी वेळोवेळी मुदतवाढ घेतली. यात अधिकाऱ्यांनी आपले हात ओले करून घेतले. या टोलमधून स्थानिक नागरिकांची रोज सरासरी 1400 वाहने फुकट जातात. असा दैनंदिन अहवाल महामंडाळाला जात होता. हा अहवाल महामंडळाच्या साईटवर रोज दिसत असायचा. मात्र 'सकाळ'मधून या दैनंदिन अहवालाची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर महामंडळाच्या साईटवरून दैनंदिन अहवाल गायब झाले. उत्तर व दक्षिण भारतात होणारी जड वाहनांची वाहतूक या मार्गावरून होत असल्याने या मार्गावर मोठी वर्दळ असताना हा टोल नाका तोटयात कसा जाऊ शकतो असा प्रश्न वाहनचालकांना पडत असे. टोलनाक्यावर कोणतीही सुविधा न देणे, चालकांवर अरेरावी करणे, त्यांना मारहाण करणे हे येथील नित्याचे प्रकार होते.  आमदार राहुल कुल यांनी या निर्णयाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे. 

 टोल बुथ काढण्याची मागणी
याबाबत भीमा पाटस कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी दैनिक सकाळचे अभिनंदन केले असून रस्ते महामंडळाने टोल बुथ काढावा. अन्यथा रात्रीच्या वेळेस तेथे बेकायदेशीररित्या टोल वसुली होऊ शकते. यापुढे पोलिसांनी यात लक्ष घालावे. असे थोरात यांनी नमूद केले आहे.    
 
पुणे - केडगाव टोल प्रकरणी सरकारकडून डोळेझाक
केडगाव टोल बंद करण्याचा विसर​

Web Title: Kedgaon tollanaka off, success of Sakal follow-up