आता पोलिसांनी पकडले तर घाबरू नका, फक्त 'हे' ठेवा जवळ

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 September 2019

वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करण्याचा पुरेपुर प्रयत्न करत. वाहन चालविण्याचा परवाना, वाहनाचा परवाना, इन्शुरन्स, पीयुसी सर्व कागदपत्रे बाळगतात. पण नेमके एखाद्या दिवशी कागदपत्रे विसरता आणि त्याच दिवशी पोलिस पकडतात. त्यामुळे कागदपत्रे असूनही दंड भरावा लागतो. यावर सरकारनेच उपाय सुचविला आहे. 

पुणे : नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जात आहे. या कारवाईमुळे आधीच धास्तावलेले वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करण्याचा पुरेपुर  प्रयत्न करत. वाहन चालविण्याचा परवाना, वाहनाचा परवाना, इन्शुरन्स, पीयुसी सर्व कागदपत्रे बाळगतात. पण नेमके एखाद्या दिवशी कागदपत्रे विसरता आणि त्याच दिवशी पोलिस पकडतात. त्यामुळे कागदपत्रे असूनही दंड भरावा लागतो. यावर सरकारनेच उपाय सुचविला आहे. 

केंद्र सरकारने DigiLocker आणि mParivahan अशी दोन अॅप सुरु केले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ही अॅप सुरु आहे. या अॅपचा वापरण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. या अॅपमध्ये इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे ठेवता येतात. वाहतूक पोलिसांना या अॅपमधील कागदपत्रे दाखविल्यास मान्य करण्याचा आदेश सरकारने दिला आहे.
mparivahan

डिजिलॉकरमध्ये कागदपत्रे साठविताना तुमची माहिती देवून नोंदणी करावी लागते. यानंतर पडताळणीसाठी मोबाईल क्रमांकावर ओटीपी येतो. खात्री झाल्यावर इन्शुरन्स कॉपी, लायसन, आरसी आदी कागदपत्रांचे फोटो अपलोड करता येणार आहेत. 

Digi Locker
एम परिवाहनवर गाडीचा क्रमांक टाकल्यास वाहनाची माहिती येते. यानंतर आरसी, ड्रायव्हिंग लायसन अपलोड करण्यासाठी नोंदणी करावी लागते.यानंतर पडताळणीसाठी मोबाईल क्रमांकावर ओटीपी येतो. यानंतर MY RC मध्ये गाडीचा नंबर आणि  पावती नंबर टाकल्यानंतर तुमच्या गाडीची आरसी दिसेल. My DL ला जाऊन ड्रायव्हिंग लायसनचा क्रमांक आणि जन्म तारीख टाकून लायसन सेव्ह करता येते.  लायसन एक असले तरी वाहने एका पेक्षा जास्त असतात. यामुळे प्रत्येक वाहनाची आरसी एकाच अॅपमध्ये सेव्ह करता येते.
No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: keep this app in mobile to avoid traffic rule violation fine